पानी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा; कोणत्या पिकांसाठी स्पर्धा, कितीचे बक्षीस.. जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Published: September 27, 2024 07:22 PM2024-09-27T19:22:39+5:302024-09-27T19:22:59+5:30

सांगली : महाराष्ट्रातील शेतकरी गटांमार्फत शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून पानी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा ...

Satyamev Jayate Farmer Cup competition organized by Pani Foundation to encourage farmers to practice sustainable agriculture | पानी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा; कोणत्या पिकांसाठी स्पर्धा, कितीचे बक्षीस.. जाणून घ्या

पानी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा; कोणत्या पिकांसाठी स्पर्धा, कितीचे बक्षीस.. जाणून घ्या

सांगली : महाराष्ट्रातील शेतकरी गटांमार्फत शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून पानी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ३६ पिकांसाठी असून, राज्यस्तरीय पहिले बक्षीस २५ लाख रुपयांचे आहे. सर्वोत्कृष्ट महिला गटासाठी पहिले बक्षीस पाच लाख रुपयांचे आहे.

शेतीत सतत येणाऱ्या संकटांना एकट्याने नाही तर एकीने लढा देण्यासाठीचा प्रयत्न समृद्ध शेतकरी आणि समृद्ध निसर्ग यांची सांगड घालू पाहणारी एक लोकचळवळ आहे. फार्मर कप म्हणजे गटशेतीची स्पर्धा आहे. गटशेतीमध्ये किमान ११ सदस्य आणि किमान १५ एकर क्षेत्र असणारा कोणताही गट स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.

या स्पर्धेचा प्रमुख हेतू म्हणजे शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आहे. मजुरी खर्चात बचत करण्यासह स्वस्तात खते आणि बियाण्याची उपलब्धता करण्याचा हेतू आहे, अशी माहिती पानी फाउंडेशनचे प्रशांत गवंडी यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांनी संघटित शेती करून उत्पादकता वाढविण्यासाठी फार्मर कप स्पर्धा आहे. यात राज्यस्तरीय पहिले बक्षीस २५ लाख रुपयांचे असून, दुसरे बक्षीस १५ लाख रुपये आणि तिसरे बक्षीस १० लाख रुपयांचे असणार आहे.

असे आहे बक्षीस

राज्यस्तरीय

पहिले बक्षीस २५ लाख
दुसरे बक्षीस १५ लाख
तिसरे बक्षीस १० लाख

सर्वोत्कृष्ट महिला बचत गटाचे पहिले बक्षीस ५ लाख
सर्वोत्कृष्ट महिला बचत गटाचे दुसरे बक्षीस ३ लाख
सर्वोत्कृष्ट महिला बचत गटाचे तिसरे बक्षीस २ लाख

तालुकास्तरीय बक्षिसे

पहिले बक्षीस ५० हजार रुपये
उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी २५ हजार रुपये

स्पर्धेत या पिकांचा समावेश

स्पर्धेत बाजरी, सोयाबीन, वाटाणा, भेंडी, टोमॅटो, धणे, तूर, गवार, रताळे, मका, कापूस, बटाटा, कांदा, कारले, कोथिंबीर, भुईमूग, नाचणी, दोडके, भात, मूग, कोबी, तोंडली, दुधी भोपळा, मिरची, वांगी, उडीद, पालक, ज्वारी, राजमा-घेवडा, फुलकोबी, ओवा, पडवळ, मेथी, भोपळा, शिमला मिरची, घोसावळी आदी पिकांचा समावेश आहे.

Web Title: Satyamev Jayate Farmer Cup competition organized by Pani Foundation to encourage farmers to practice sustainable agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.