शिराळा तालुक्यात १६ शिक्षिकांना सावित्री-फातिमा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:26 AM2021-01-08T05:26:59+5:302021-01-08T05:26:59+5:30
पुनवत : शिक्षक भारती सांगली संघटनेच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त २०२०-२०२१ मध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ...
पुनवत : शिक्षक भारती सांगली संघटनेच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त २०२०-२०२१ मध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शिराळा तालुक्यातील विविध केंद्रांतील सोळा महिला शिक्षिका सावित्री-फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.
वारणावती केंद्राच्या सविता युवराज शिंदे, आरळा येथील विद्या नामदेव पाटील, प. त. वारुण येथील शैला वसंत वारंग, नाठवडे येथील जयश्री भीमराव तेली, मेणी येथील तमेजबी अहमद मुलाणी, कोकरूड येथील सुमन रावसाहेब कुलकर्णी, रिळे येथील सुवर्णा रघुनाथ पाटील, बिऊर येथील सुवर्णा महेश विभुते, नाटोली येथील कविता अविनाश पाटील, मांगले येथील संगीता केशव पवार, सुजाता सुहास रोकडे, शिराळा येथील वैशाली अरुण कारंडे, निगडी येथील स्वप्ना हिंदुराव दाभाडे, प. त. शिराळा येथील वर्षाराणी हिराचंद शिंदे, वाकुर्डे खुर्द येथील माधुरी निवास लोखंडे यांना पुरस्कार मिळाला आहे. माध्यमिक विभागात गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आरळा येथील सुनीता उत्तम कदम, मंगलनाथ विद्यामंदिर, मांगले येथील सावली राजेंद्र पाटील यांना पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षिकांचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, विस्तार अधिकारी विष्णू दळवी, बाजीराव देशमुख, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे, जिल्हा सरचिटणीस कृष्णा पोळ, तालुकाध्यक्ष दादासाहेब खोत, तालुका सरचिटणीस अमोल जाधव, शिराळा तालुका माध्यमिक शिक्षक भारती अध्यक्ष बाजीराव जाधव, साधनव्यक्ती मधुकर डवरी, पांडुरंग गायकवाड, प्रदीप कदम यांच्यासह पदाधिकारी व शिक्षकांनी कौतुक केले.