सावित्रीबाईनी स्त्रीमुक्तीच्या वाटा खुल्या केल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:55+5:302021-01-09T04:21:55+5:30

इस्लामपूर : भारतीय समाजव्यवस्थेत आपणास दुय्यम स्थान देऊन आपले शोषण केले जात असल्याची जाणीवही स्त्रियांना नव्हती. मात्र क्रांतिज्योती सावित्रीबाई ...

Savitribai opened the door for women's liberation | सावित्रीबाईनी स्त्रीमुक्तीच्या वाटा खुल्या केल्या

सावित्रीबाईनी स्त्रीमुक्तीच्या वाटा खुल्या केल्या

Next

इस्लामपूर : भारतीय समाजव्यवस्थेत आपणास दुय्यम स्थान देऊन आपले शोषण केले जात असल्याची जाणीवही स्त्रियांना नव्हती. मात्र क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ही विषमता व पिळवणुकीविरुद्ध अखंड संघर्ष उभा करीत स्त्रीमुक्तीच्या वाटा खुल्या केल्या आहेत, अशी भावना प्रा. सचिन गरुड यांनी व्यक्त केली.

इस्लामपूर येथील प्रभाग २ मध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात प्रा. गरुड बोलत होते. रूपाली खंडेराव जाधव अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सदस्या कमल पाटील, शहराध्यक्षा रोझा किणीकर, प्रा. प्रज्ञा खंडेलोटे उपस्थित होत्या.

सुप्रिया कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा प्रतिनिधी शैलजा जाधव, ज्योत्स्ना शिंदे, योगिता माळी, सुनीता काळे, नीता पाटील, सुनंदा साठे, मनीषा पेठकर, सुलोचना पवार उपस्थित होत्या. मीरा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळी- ०८०१२०२१-आयएसएलएम-महिला मेळावा न्यूज

फोटो ओळ : इस्लामपूर येथे महिला मेळाव्यात प्रा. सचिन गरुड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रूपाली जाधव, रोझा किणीकर, कमल पाटील, प्रा. प्रज्ञा खंडेलोटे उपस्थित होत्या.

Web Title: Savitribai opened the door for women's liberation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.