सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींना शिक्षणाची कवाडे खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:28 AM2021-01-03T04:28:18+5:302021-01-03T04:28:18+5:30
देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री महालक्षी हायस्कूलमध्ये क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व वर्षारंभ काव्योत्सवानिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत ...
देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री महालक्षी हायस्कूलमध्ये क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व वर्षारंभ काव्योत्सवानिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. याप्रसंगी प्रा. डाॅ. आबासाहेब शिंदे उपस्थित होते. महाजन म्हणाले. जीवनात काही करायचे असेल, तर कोणत्याही गोष्टींचा ध्यास असावा लागतो. ध्यास असल्याशिवाय कोणीतीही गोष्ट शक्य नाही. सावित्रीबाई फुले यांना मुलींच्या शिक्षणाचा ध्यास होता. तो त्यांनी करुनही दाखवला. शिक्षणामध्ये नवनिर्मिती असायला पाहिजे. हे तितकेच सत्य आहे. तारुण्यात जे जे करता येते, ते ते उत्तम दर्जाचे करत जावे. समृद्धीतून नवनिर्माण करता येते, हे विसरुन चालणार नाही. काळावर मात करण्याची आपल्यात धमक असावी लागते.
प्रा. डाॅ. आबासाहेब शिंदे म्हणाले की आजच्या तरुणांना कवितेची जितकी आवड आहे, तितकेच कथा वाचण्याची आणि लिहिण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. साहित्याचा अभ्यास करताना प्रत्येक बोली भाषा अवगत होणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर आजच्या मुलांनी मोबाईल वापरताना खबरदारी घेणे तितकेच म्हत्वाचे आहे.
कार्यक्रमात श्री महालक्ष्मी हायस्कूलमधील सृष्टी कुलकर्णी, ॠतुजा चव्हाण, सृष्टी सदामते, नंदिनी कदम, राजवर्धन पाटील, वेदिका खांडेकर यांनी काव्यवाचन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले. सुरेखाताई कांबळे यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा भोसले, सतीश भोसले उपस्थित होते.
फाेटाे : ०२ शिरढाेण १
ओळ : देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री महाल्क्षी हायस्कूलमध्ये क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयाेजित कार्यक्रमात जेष्ठ लेखक व समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. डाॅ. आबासाहेब शिंदे, प्रतिभा पाटील, मनीषा पाटील, सुरेखाताई कांबळे उपस्थित हाेते.