खरिपासाठी सव्वालाख टन खत, ५० क्विंटल बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:45 AM2018-05-03T00:45:54+5:302018-05-03T00:45:54+5:30
सांगली : जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणीची कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे.
सांगली : जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणीची कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आदी एक लाख २२ हजार ५० टन रासायनिक खते आणि ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कडधान्याच्या ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची जिल्ह्याला गरज लक्षात घेऊन महाबीज आणि खासगी कंपन्यांकडून मागणी केली आहे. मागणीनुसार २६ हजार टन खत जिल्ह्यात उपलब्ध झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी विभागाच्या अधिकाºयांनी २०१८ च्या खरीप पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात खरिपाचे सुमारे दोन लाख ९५ हजार हेक्टरपर्यंतचे क्षेत्र आहे. या क्षेत्राला लागणारे बियाणे आणि खते मान्सून पावसापूर्वी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे.
रासायनिक खताची तालुकानिहाय मागणी
तालुका मागणी (टनामध्ये)
आटपाडी १०४६०
जत ११२७५
कडेगाव ११८२०
क़महांकाळ ११११६
मिरज १३३००
पलूस १२८१०
शिराळा ११९२०
तासगाव १३०५६
खानापूर १३७३२
वाळवा १३७३२
एकूण १२२२५०
बियाणे प्रकार मागणी क्विंटल महाबीज खासगी कंपन्या
खरीप ज्वारी ६७७९ २६७२ ४१०७
बाजरी २३७२ ९०९ १४६३
भात ५०४० २०१६ ३०२४
मका ५१८३ २०३३ ३१५०
भुईमूग ९६३० ३८५२ ५७७८
सोयाबीन १९१०० ७५१८ ११५८२
मूग ४५७ १८३ २७४
उडीद ५८८ २३५ ३५३
तूर ८५५ ३४२ ५१३
सूर्यफुल २२५ ९० १३५
एकूण ५०२२९ १९८५० ३०३७९