बँकेतून बोलत असल्याचे सांगत नागरिकांच्या पैशावर डल्ला!;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:21 AM2020-12-07T04:21:08+5:302020-12-07T04:21:08+5:30
सांगली : बँक अधिकारी असल्याचे सांगत खात्याची माहिती घेत त्याव्दारे नागरिकांच्या पैशावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढत आहेत. उत्तर भारतातील ...
सांगली : बँक अधिकारी असल्याचे सांगत खात्याची माहिती घेत त्याव्दारे नागरिकांच्या पैशावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढत आहेत. उत्तर भारतातील राज्यातून फोन करून फसवणूक करण्यात येत आहे. याबाबत तक्रारी वाढत असल्या तरी, तांत्रिक कारणाने या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना आव्हानात्मक बनले आहे.
गेल्या काही वर्षांपर्यंत मोठ्या शहरांपुरते मर्यादित असलेले ऑनलाईन फसवणुकीचे लोण आता खेडोपाडीही पोहोचले आहे. त्यामुळेच बँकेतून बोलत असल्याचे सांगत एटीएमचा पासवर्ड, सीव्हीव्ही क्रमांक विचारून फसवणूक केली जात आहे. यासह फेसबुकवर पैसे पाठविण्याची विनंती करूनही अनेकांची फसवणूक केली जात आहे.
लॉकडाऊनमध्येही अशाप्रकारे चोरीचे प्रकार वाढले होते. त्यामुळे महत्त्वाची माहिती न देणे शहाणपणाचे ठरणार आहे. नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास सावधपणा बाळगावा. आपली खासगी माहिती, बँक खात्याची माहिती दिल्यास फसवणुकीची शक्यता अधिक आहे