महापालिकेच्या वीज बिलात सव्वा कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 AM2021-01-09T04:22:08+5:302021-01-09T04:22:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या वीज बिल घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढ आहे. प्रशासनाने ३० लाखांचा घोटाळा असल्याची कबुली ...

A scam of Rs | महापालिकेच्या वीज बिलात सव्वा कोटींचा घोटाळा

महापालिकेच्या वीज बिलात सव्वा कोटींचा घोटाळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या वीज बिल घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढ आहे. प्रशासनाने ३० लाखांचा घोटाळा असल्याची कबुली दिली असली तरी प्रत्यक्षात हा आकडा कोटीच्या घरात गेला आहे. त्यात आता नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी १ कोटी २९ लाख रुपयांचा वीज बिल घोटाळा झाल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

महापालिका मुख्यालय, विविध कार्यालये, पाणीपुरवठा, दिवाबत्तीसह विविध विभागांची वीज बिले दरमहा विद्युत विभागाकडे येतात. या बिलापोटी धनादेश महावितरणचा कर्मचारी घेऊन जात होता. हा कर्मचारी खासगी भरणा केंद्रात बिले भरत होता; पण गेल्या वर्षभरात महापालिकेच्या बिलांची रक्कम ‘महावितरण’कडे जमा करण्यात आली नाही. वीजबिलाची थकबाकी समोर येताच ‘महावितरण’ने महापालिकेला पत्र पाठवून शहानिशा करण्यास सांगितले. त्यानंतर वीज बिलांच्या घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महापालिकेने पोलिसांत महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह खासगी भरणा केंद्राच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेच्या लेखा विभागाने ३० ते ३२ लाखांचा घोटाळा झाल्याचे मान्य केले आहे; पण आता घोटाळ्याची रक्कम सव्वा कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा साखळकर यांनी केला आहे. हा सारा घोटाळा गेल्या ९ महिन्यांच्या कालावधीमधील आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. २०१० पासून ‘महावितरण’कडून आलेली बिले आणि महापालिकेने अदा केलेली रक्कम याचा ताळमेळ घातल्यास घोटाळ्याची रक्कम आणखी काही कोटींमध्ये वाढू शकते. लेखा विभागाचा कारभार संशयास्पद आहे. त्यामुळे या विभागातील विशेष चौकशी करावी, अशी मागणी साखळकर यांनी केली आहे.

चौकट

...तरीही थकबाकी शून्य कशी?

महापालिकेच्या वीजबिलात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे महावितरणच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे तरीही महापालिकेच्या वीज बिलाची थकबाकी दिसत नाही. याचा शोध घेतला असता धक्कादायक प्रकार समोर आला. मिरजेतील एका झोपडपट्टी प्रकल्पाचे डिसेंबरमध्ये वीज बिल २ लाख आले होते. त्यापोटी महापालिकेने २ लाखांचा धनादेश दिला. पुढील महिन्यात थकबाकीसह ४ लाखांचे बिल आले. महापालिकेने तेही भरले पण पूर्वीचे बिल भरल्याची खातरजमा केलीच नाही. त्यामुळेच महापालिकेच्या वीज बिलाची थकबाकी दिसत नसल्याचे साखळकर यांनी सांगितले.

Web Title: A scam of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.