ग्रामीण भागातील दिव्यांगांपर्यंत योजना पोहोचविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:28+5:302021-09-07T04:31:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ग्रामीण भागातील सर्वसामान्य दिव्यांगांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जगणे सुखकर करण्यासाठी माझा प्रयत्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ग्रामीण भागातील सर्वसामान्य दिव्यांगांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जगणे सुखकर करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. दिव्यांग संघटनेचेही सर्व प्रश्न तत्काळ सोडविण्यात येतील, असे आश्वासनही जिल्हा परिषदेचे नूतन समाजकल्याण अधिकारी बाबासाहेब कामत यांनी दिले.
जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी बाबासाहेब कामत यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. याबद्दल प्रहार संघटनेचे अध्यक्ष रामदास कोळी, दिव्यांग प्रहार अधिकारी, कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष यशवंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कामत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक दिव्यांगांना शासनाच्या योजनांची माहिती नसल्यामुळे ते वंचित राहत आहेत. म्हणूनच आम्ही प्राधान्याने ग्रामीण भागातील दिव्यांगांचा शोध घेऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. घरकुलापासून ते छोटे उद्योग उभारण्यासाठीही निधी देऊन त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठीही माझा प्रयत्न असणार आहे.
यावेळी प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख शीतल दबडे, सचिव सुरेश गायकवाड, विनोद पाटील, परशुराम कोट्याळ, जोतिराम शेजवळकर, उज्ज्वला परीट, वैशाली शेजवळकर आदी उपस्थित होते.