तांत्रिक बिघाडामुळे शिष्यवृत्तीचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 11:16 PM2017-07-29T23:16:23+5:302017-07-29T23:17:49+5:30
सांगली : सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे महाविद्यालयीन, डी. एड्., अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाºया मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वर्षभरापासून मिळाली नाही. याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
सांगली : सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे महाविद्यालयीन, डी. एड्., अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाºया मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वर्षभरापासून मिळाली नाही. याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे, शासनाकडूनच मिळाली नसल्याची उत्तरे शाळा प्रशासनाकडून मिळत आहेत. म्हणून मागील शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती येत्या आठ दिवसांत न मिळाल्यास विद्यार्थ्यांसह विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी आठवड्यात शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे सांगितले. मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात म्हणूनच शासनाने शिष्यवृत्ती सुरु केली आहे.
शैक्षणिक पुस्तके, प्रवेशासाठी पैशाची मदत होण्यासाठी शिष्यवृत्ती सुरु आहे. पण, प्रत्यक्षात शासकीय उदासीन कारभारामुळे महाविद्यालयीन, डी. एड्. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना कधीच वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही. यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक संकटातच पूर्ण होत आहे. म्हणूनच राज्य शासनाकडून वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
२०१६-१७ शैक्षणिक वर्ष संपले असून, दुसरे शैक्षणिक वर्षे सुरु झाले आहे. तरीही विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीमधील पैसे मिळाले नाहीत. यामुळे चालू वर्षातील शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या विद्यार्थ्यांना येत्या आठ दिवसांत शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्यास विविध विद्यार्थी संघटनांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सामाजिक न्याय विभागाकडील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त सचिन कवले यांनी बहुतांशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. काही विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरमधील तांत्रिक चुकांमुळे शिष्यवृत्ती मिळाली नाही. येत्या आठ दिवसात सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.