संस्थाचालक १५ जानेवारीनंतर शाळा बंद ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:24 AM2021-01-08T05:24:46+5:302021-01-08T05:24:46+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोल्हापूर विभाग व जिल्हा संघाची सांगलीत बैठक झाली. या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी ...
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोल्हापूर विभाग व जिल्हा संघाची सांगलीत बैठक झाली. या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष अशोकराव थोरात, नितीन खाडिलकर, आर. एस. चोपडे, अरुण दांडेकर, विनोद पाटोळे, प्रा. एन. डी. बिरनाळे, प्रा. शिवपुत्र आरबोळे, प्रा. एम. एस. रजपूत आदी उपस्थित होते.
रावसाहेब पाटील म्हणाले, शासनाने तातडीने कोविड प्रतिबंधक ऑक्सिमीटर, थर्मल गन, सॅनिटायझर आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी संस्थांना आर्थिक मदत द्यावी, थकीत वेतनेतर अनुदान वितरीत करावे, शिक्षण हक्क कायद्याखाली प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्यावी, इमारत भाडे द्यावे, ऑनलाईन शिक्षणासाठी येणारे वीजबिल माफ करावे, शिक्षणावर १० टक्के खर्च करावा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती पूर्वीप्रमाणे वेतनश्रेणीवर करायला परवानगी द्यावी, विद्यार्थी प्रवेश फी हप्त्याने घेण्याचा आदेश मागे घ्यावा व शाळांची आर्थिक कुचंबणा थांबवावी, अन्यथा दि. १५ जानेवारीनंतर संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभागाने ‘बेमुदत शाळा बंद आंदोलन’ करण्यात येईल. याबाबतचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी राज्यस्तरावरील बैठकीत घेतला आहे.
चौकट
पूर्वीप्रमाणे शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत व्हावे, यासाठी न्यायालयात दाद मागण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता कशी करावी यासंदर्भात ॲड. रणजित गुरव यांनी सूचना मांडली. वेतनेतर अनुदान पूर्वीप्रमाणेच मिळाले पाहिजे, यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णयही संस्थाचालकांनी घेतला.