एस.डी.पाटील यांचे बहुजन समाजासाठी योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:21+5:302021-01-25T04:27:21+5:30
इस्लामपूर : स्व. खासदार एस. डी. पाटील यांनी प्रतिकूल काळात बहुजनांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्यातून संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी ...
इस्लामपूर : स्व. खासदार एस. डी. पाटील यांनी प्रतिकूल काळात बहुजनांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्यातून संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. राजकारणातील विविध पदे भूषविताना त्यांनी दूरदृष्टीतून सामाजिक बांधिलकी जपली, असे प्रतिपादन शिक्षक आ. जयंत आसगावकर यांनी केले. वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व. खा. एस. डी. पाटील यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सचिव ॲड. बी. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ॲड. चिमन डांगे, प्रकाशभाई शहा, सखाराम जाधव, प्रकाश चव्हाण, विजयराव नलवडे, सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील, प्रा. अरुणादेवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. बी. एस. पाटील यांनी लिहिलेल्या 'सुधाई' या मातृ चरित्राचे प्रकाशन आ. आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ॲड. पाटील म्हणाले, वडील स्व. खा. एस. डी. पाटील यांच्या जीवनातील सामंजस्य, सहिष्णुता, चारित्र्यसंपन्नता व दुर्दम्य इच्छाशक्ती या सद्गुणांचा ठेवा हीच आमची वैचारिक श्रीमंती आहे. प्रत्येक माणसात परमेश्वर आहे. उत्तम समाजभान असणाऱ्या व्यक्तींची साहित्य शैली समृद्ध होते.
यावेळी साहित्यिक दि. बा. पाटील, डॉ. दीपक स्वामी यांनी समीक्षण केले. वसंतराव कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनाकाळात केलेल्या उत्तम रुग्णसेवेबद्दल डॉ. राणोजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. धैर्यशील पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर यांनी आभार मानले.
यावेळी विलासराव पाटील, संपतराव पाटील, संजय पाटील, शंतनु पाटील, सर्जेराव देशमुख, डॉ. प्रसन्नकुमार पुदाले, हरिश्चंद्र माने, दत्ताजीराव करांडे उपस्थित होते.
फोटो-