कारखान्यांची गोदामे सील करा
By Admin | Published: July 9, 2015 11:31 PM2015-07-09T23:31:42+5:302015-07-09T23:31:42+5:30
राजू शेट्टी : एफआरपीप्रश्नी सक्षम अधिकाऱ्यांकडून लेखापरीक्षणाची मागणी '
मिरज : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्जाचा गोंधळ सुरूच असून तांत्रिक बिघाडामुळे गुरुवारीही उमेदवारांचे आॅनलाईन अर्ज दाखल झाले नाहीत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून गुरुवारपर्यंत २२ ग्रामपंचायतींसाठी केवळ ३०० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मिरज तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जांची प्रक्रिया आॅनलाईन आहे. मात्र आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीकडील डाटा आॅपरेटरना अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण दिलेले नाही. यामुळे दि. ४ पासून सहा दिवसात केवळ २९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व्हर मिळत नसल्याने सर्व्हर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
गुरुवारी सर्व्हर उपलब्ध झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल झाले. मात्र सर्वांचे उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकले नाहीत. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने आॅनलाईन अर्ज भरला गेला नाही, तर अनेक इच्छुकांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची भीती आहे.
खासगी संगणक केंद्रांतून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन हजार रुपये उकळण्यात येत आहेत. (वार्ताहर)
हस्तदेय अर्जाची मागणी
अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज विहित मुदतीमध्ये दाखल होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवावी किंवा पूर्वीप्रमाणे हस्तदेय अर्ज भरून घेण्यात यावेत, अशी मागणी सभापती दिलीप बुरसे यांनी निवेदनात केली आहे.