सोन्याळमध्ये बारा दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:54+5:302021-05-18T04:26:54+5:30
माडग्याळ : जत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात पूर्ण लाकडाऊन करत निर्बंध घातले आहेत. असे असतानाही ...
माडग्याळ : जत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात पूर्ण लाकडाऊन करत निर्बंध घातले आहेत. असे असतानाही सोन्याळ (ता. जत) येथे बारा दुकानदारांनी बेजबाबदारपणे दुकाने उघडी ठेवली आहेत. याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने दुकाने सील केली आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी पथकाने कारवाई केली आहे. प्रशासनाने सील ठोकलेल्या दुकानदारांमध्ये गुरुराज पुजारी यांचे मोबाईल दुकान, दस्तगीर नदाफ यांचे किराणा दुकान, गुरू निंगप्पा मुचंडी यांचे मोबाईल शाॅपी, मल्लिकार्जुन निवर्गी, महिबूब नदाफ, खुतबुद्दीन नदाफ, सोमविंग पुजारी, गुरसिद्द बिरादार, लिंबाजी परीट, जैनुद्दीन नदाफ, दर्याप्पा कांबळे, आदी दुकानदारांचा समावेश आहे.
कोरोनाचा प्रभाव अजूनही कायम आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे दुकानदारांनी व नागरिकांनी पालन करावे, कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यासाठी प्रशासन अहोरात्र काम करीत आहे. प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करून कोरोनाची साखळी तोडणे कामी सहकार्य करणे गरजेचे असताना बेफिकीरपणे दुकान उघडून प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरू नका. स्वत: व इतरांनाही धोक्यात घालू नका, असे आपत्ती व्यवस्थापनाकडून आवाहन करण्यात आले आहे.