गव्हाणे कुटुंबाच्या आत्महत्येप्रकरणी १४ जणांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:57+5:302021-01-25T04:27:57+5:30
अण्णासाहेब गवाणे यांच्यासह त्यांचा मुलगा महेश आणि पत्नी मालती गव्हाणे यांनी शुक्रवारी पहाटे घरात गळफास लावून आत्महत्या केली. महेश ...
अण्णासाहेब गवाणे यांच्यासह त्यांचा मुलगा महेश आणि पत्नी मालती गव्हाणे यांनी शुक्रवारी पहाटे घरात गळफास लावून आत्महत्या केली. महेश गव्हाणे याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत १४ जणांचे ८४ लाख रुपये देणे असल्याचे तसेच त्यांनी पैशाचा तगादा लावल्याने आम्ही तिघे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. या चिठ्ठीत सांगली, कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी विवेक घाटगे, किरण होसकोट, राजीव शिंगे, (रा. रायबाग, जि. बेळगाव), विनायक बागेवाडी, संतोष मंगसुळी (रा. हरुगिरी, जि. बेळगाव), अमितकुमार कांबळे, प्रवीण बनसोडे, पूजा शिंगाडे, शैलेंद्र शिंदे (रा. मिरज), बाळासाहेब माळी (रा. कवठेमहांकाळ), कमलेश कलमाडी (रा. नरवाड), अरुण थोरात, जितेंद्र पाटील (रा. सांगली), व जुबेर मोकाशी ऊर्फ जुबेर माैलाना (रा. कुरुंदवाड) या चाैदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संबंधिताचा शोध सुरू असून सर्वांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.