Sangli: तासगावात येरळेतून दाम्पत्य गेले वाहून, एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 04:17 PM2024-08-27T16:17:38+5:302024-08-27T16:17:56+5:30

तासगाव : येथील तासगाव ते तुरची दरम्यान जुना सातारा रस्त्यावरील येरळा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. या प्रवाहात एक ...

Search operation by NDRF team after couple drifted from Yerle in Tasgaon sangli | Sangli: तासगावात येरळेतून दाम्पत्य गेले वाहून, एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम

Sangli: तासगावात येरळेतून दाम्पत्य गेले वाहून, एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम

तासगाव : येथील तासगाव ते तुरची दरम्यान जुना सातारा रस्त्यावरील येरळा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. या प्रवाहात एक वृद्ध जोडपे दुचाकीसह वाहून गेले. सोमवारी दुपारी ही घटना घडली. त्यानंतर ‘एनडीआरएफ’ चे पथक शोध घेण्यासाठी दाखल झाले. मात्र शोध लागला नाही. दरम्यान, वाहून गेलेल्या जोडप्याची नेमकी ओळख समजू शकलेली नाही.

मागील चार दिवसांपासून तालुक्यात आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे येरळा नदीचे पात्र भरून वाहत आहे. जुना सातारा रस्त्यावरील तासगाव ते तुरचीच्या दरम्यान पुलावर चार दिवसांपासून दीड ते दोन फूट उंचीने पाणी वाहत आहे. प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र काही नागरिक त्यातूनही वाट काढून पुलावरून ये-जा करत होते.

सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तासगावहून तुरचीच्या दिशेने एक पुरुष आणि महिला दुचाकीवरून जात होते. या पुलावरून जात असताना तिथे उभ्या असणाऱ्या काही तरुणांनी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जाऊ नका, अशी विनंती केली होती. मात्र त्यातूनही हे जोडपे पाण्यातून पलीकडे जात असताना पाण्याचा प्रवाह वाढला. पुलावरून ते नदीपात्रात पडले आणि वाहून गेले.

या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. पथकाने सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत शोध मोहीम राबवली. मात्र, शोध लागला नाही. सायंकाळी ही शोध मोहीम थांबवण्यात आली. वाहून गेलेले जोडपे नेमके कोण आहे, याची माहिती अद्याप लागलेली नाही. तासगाव पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Search operation by NDRF team after couple drifted from Yerle in Tasgaon sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.