कोरोनावरील लसीचा दुसरा डोस मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:27 AM2021-05-11T04:27:14+5:302021-05-11T04:27:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : ज्यांचा कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेऊन झाला आहे, त्यामधील अनेकांना निश्चित वेळेत दुसरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : ज्यांचा कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेऊन झाला आहे, त्यामधील अनेकांना निश्चित वेळेत दुसरा डोस मिळत नाही. यामुळे संबंधित नागरिकांमध्ये चिंता वाढल्याचे चित्र कडेगाव तालुक्यात आहे.
पहिल्या लसीकरणानंतर दुसरा डोस घेण्यास विलंब होत असला तर काळजी करू नका, असे वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. मात्र पहिल्या डोसनंतर २८ ते ४२ दिवसांपर्यंत दुसरा डोस घेतला नाही, तर काय, अशी चिंता ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत. कोरोनामुक्तीसाठी लस हा रामबाण उपाय आहे. यामुळे लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर महिनाभरानंतर दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्र गाठत आहेत. मात्र लसीचा साठा नसल्याने अनेकांना लसीचा दुसरा डोस घेता येत नसल्याचे चित्र आहे.
चौकट
प्रसंगी राज्य शासनाने दुसरा डोस द्यावा
केंद्र शासनाकडून ४५ वर्षावरील लोकांना तर राज्य शासनाकडून १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लस दिली जाते. दुसरे डोस देण्यास खूपच विलंब होत आहे. त्यामुळे राज्य शासनाची उपलब्ध झालेली लस ४५ वर्षावरील नागरिकांना द्यावी. अन्यथा खूप विलंब झाल्यास दुसरा डोस घेऊन तरी त्याचा काय उपयोग होणार, असा सवाल ज्येष्ठ नागरिक करीत आहेत.