माध्यमिक शिक्षकांचे सोमवारी काळ्या फिती लाऊन काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 05:32 PM2021-07-03T17:32:07+5:302021-07-03T17:33:44+5:30

Education Sector Teacher Sangli: शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील शिक्षक सोमवारी (दि.५) काळ्या फिती लाऊन काम करणार आहेत. शिक्षक परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी ही माहिती दिली.

Secondary teachers work with black ribbons on Monday | माध्यमिक शिक्षकांचे सोमवारी काळ्या फिती लाऊन काम

माध्यमिक शिक्षकांचे सोमवारी काळ्या फिती लाऊन काम

Next
ठळक मुद्देमाध्यमिक शिक्षकांचे सोमवारी काळ्या फिती लाऊन काम शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांकडे लक्ष वेधणार

सांगली : शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील शिक्षक सोमवारी (दि.५) काळ्या फिती लाऊन काम करणार आहेत. शिक्षक परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शिक्षण क्षेत्राच्या अनेक मागण्यांच्या पुर्ततेसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहेत, पण शासन दुर्लक्ष करत आहे. २००५ पूर्वी रुजू झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन व भविष्यनिर्वाह निधी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा, २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी,  आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.

कोरोनाग्रस्तांना विशेष रजा व प्राधान्य अनुकंपा योजना लागू करावी, अघोषित शाळा व तुकड्यांना निधीसह अनुदानास पात्र जाहीर करावे, अंशत: अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण द्यावे, २००३ पासूनच्या अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता द्यावी, विशेष शिक्षकांना नियमित व थकीत वेतन द्यावे, त्यांचे समायोजन करावे, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रद्द करु नयेत, संगणक शिक्षकांना सेवेत घ्यावे, भ्रष्टाचारी शिक्षणाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ग्रंथपालांसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी, अशैक्षणिक कामांतून मुक्तता करावी, कॅशलेस विमा योजना लागू करावी, क्रीडा विभागाच्या अनुदान वितरणातील भ्रष्टाचार थांबवावा आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. निवेदनावर नागरगोजे यांच्यासह बजरंग शिंदे, विजय माने, रमेश कोष्टी, बाळासााहेब चोपडे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Secondary teachers work with black ribbons on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.