मिरज-पुणे मार्गावर रात्रीच्या रेल्वेगाड्यांना सुरक्षा दलाचा बंदोबस्त, तीन एक्स्प्रेस लुटण्याच्या घटनेमुळे यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 09:40 PM2018-08-20T21:40:37+5:302018-08-20T21:42:22+5:30
मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील सालपा व आदर्की स्थानकाजवळ सिग्नलची वायर कापून एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केल्यामुळे रात्री धावणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील सालपा व आदर्की स्थानकाजवळ सिग्नलची वायर कापून एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केल्यामुळे रात्री धावणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी सालपा रेल्वे स्थानकाजवळील सिग्नलची वायर कापून, कोल्हापूरहून मुंबईला निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस व सह्याद्री एक्स्प्रेस या गाड्या रोखून चोरट्यांनी प्रवाशांना लुबाडण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून महिला प्रवाशांचे दागिने हिसकावले. एक्स्प्रेसमध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र दरोडेखोरांनी अंधारात शेतीतून पलायन केले.
महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस व एलटीटी हुबळी एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न केल्याने रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांची स्वतंत्र तपास पथके नियुक्त करण्यात आली आहेत. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलीस उपअधीक्षकांनी भेट देऊन पाहणी केली. शेणोली ते लोणंद स्थानकादरम्यान रात्री धावणाºया सर्व एक्स्प्रेस गाड्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रशिक्षित कमांडोंचा बंदोबस्त देण्यात आला आहे. लूटमारीबाबत प्रवाशांनी तक्रार केली नाही. मात्र सिग्नल यंत्रणेत बिघाड करणाºया अज्ञातांविरूध्द सातारा रेल्वे सुरक्षा दलाने गुन्हा दाखल केला आहे. सातारा व मिरज रेल्वे सुरक्षा दल, मिरज रेल्वे पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे.