' त्या' महाविद्यालयीन युवतींना तासगाव पोलिसांनी रात्रीच्यावेळी काय केले पहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:04 PM2019-12-19T22:04:52+5:302019-12-19T22:05:48+5:30
घरी जाण्यासाठी उशीर होत असल्याने पोलीस निरीक्षक सावंत्रे यांनी या मुलींना घरी सोडवण्याची सूचना केली. त्यानुसार पोलीस वाहनातून संबंधित मुलींना सुखरूपपणे त्यांच्या घरी सोडण्यात आले. पोलिसांकडून मुलींना थेट घरी आणून सोडल्यामुळे पालकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
तासगाव : वेळेत बस नसल्याने ग्रामीण भागातील महाविद्यालयीन तरुणी तासगाव बसस्थानकावर अडकल्या होत्या. पोलिसांच्या गस्तीदरम्यान या मुली निदर्शनास आल्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या सूचनेनुसार या मुलींना पोलीस वाहनातून सुखरूप त्यांच्या गावी सोडण्यात आले. पोलिसांच्या या कृतीचे पालकांकडून कौतुक करण्यात आले.
तासगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी तासगाव शहरात येत असतात. बुधवारी महाविद्यालय सुटल्यानंतर बोरगाव, निंंबळक, शिरगाव परिसरातील मुली तासगाव बसस्थानकावर बराच वेळ बसून होत्या. वेळेत बस नसल्याने अंधार पडला तरी त्यांना बसस्थानकावर ताटकळत बसावे लागले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तासगाव पोलीस गस्तीपथक बसस्थानकावर आले होते. यावेळी इतक्या उशिरापर्यंत अनेक मुली बसस्थानकावर बसून असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अधिक माहिती घेतली असता, वेळेत बस नसल्याचे निदर्शनास आले.
घरी जाण्यासाठी उशीर होत असल्याने पोलीस निरीक्षक सावंत्रे यांनी या मुलींना घरी सोडवण्याची सूचना केली. त्यानुसार पोलीस वाहनातून संबंधित मुलींना सुखरूपपणे त्यांच्या घरी सोडण्यात आले. पोलिसांकडून मुलींना थेट घरी आणून सोडल्यामुळे पालकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
तासगाव बसस्थानकावर बस नसल्याने घरी जाण्यासाठी उशीर झालेल्या मुलींना पोलीस वाहनातून त्यांच्या गावी सोडण्यात आले.