वारणावतीतील भूकंपमापन यंत्र कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:51+5:302021-04-16T04:26:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : चांदोली-वारणावती (ता. शिराळा) येथे मातीचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून, कोयना धरण व चांदोली ...

Seismometer in Varanasi outdated | वारणावतीतील भूकंपमापन यंत्र कालबाह्य

वारणावतीतील भूकंपमापन यंत्र कालबाह्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : चांदोली-वारणावती (ता. शिराळा) येथे मातीचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून, कोयना धरण व चांदोली धरण यांच्या पाणलोट क्षेत्रात भूकंपाचे केंद्रबिंदू आहेत. मात्र, वारणावती येथील भूकंपमापन यंत्र कालबाह्य झाले आहे. तेथे प्रशिक्षित कर्मचारीही नाहीत.

चांदोली धरणात १९८६ मध्ये पाणी साठवण्यास सुरुवात झाली. तेव्हा भूकंपमापन यंत्र बसविण्यात आले. या यंत्रातील कागद हातानेच बदलले जातात. या यंत्राद्वारे निघालेल्या आलेखावरून किती रिश्टर स्केलचा भूकंप झाला, याचा निष्कर्ष काढला जातो. तंत्रज्ञान बदलले तरीही हे जुने यंत्रच वापरले जात आहे. ते अनेकवेळा बंद पडले आहे. भूकंप झाल्यावर हे यंत्र बंद पडल्यास इतर कार्यालयाकडून माहिती घेऊन भूकंपाचे गणित मांडले जाते. प्रयोगशाळा सहाय्यक पदाचे कर्मचारी निवृत्त झाले आहेत. मात्र, अजूनही या रिक्त जागा भरलेल्या नाहीत.

गेल्या काही वर्षांपासून येथे प्रशिक्षित कर्मचारीही नाहीत. तेथील सुरक्षारक्षकच या यंत्रातील कागद बदलणे, नोंदी ठेवणे अशी कामे करीत आहेत. काहीवेळा निवृत्त कर्मचाऱ्यांना बोलावून भूकंपाचे गणित मांडले जाते. त्यामुळे चांदोली धरणावर आधुनिक भूकंपमापन केंद्र बनवून प्रशिक्षित कर्मचारी नेमण्याची मागणी होत आहे.

चौकट

कर्मचारी नसल्याने तीन ठिकाणची यंत्रणा बंद

कर्मचारी नाहीत म्हणून चिखली (संगमेश्वर), साखरपा, मराठवाडी (सातारा) येथील भूकंपमापन यंत्रणा बंद आहेत. ही कार्यालयेही बंद करण्यात आली आहेत. आता चांदोली (वारणावती) व कोकरूड येथेही कार्यालये व यंत्रे सुरू आहेत.

Web Title: Seismometer in Varanasi outdated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.