विदेशी सिगारेटचा बेकायदेशीर साठा जप्त

By Admin | Published: October 14, 2015 11:12 PM2015-10-14T23:12:38+5:302015-10-15T00:28:47+5:30

एलसीबीची कारवाई : सातजणांवर गुन्हे

Seized illegal cigarettes of foreign cigarettes | विदेशी सिगारेटचा बेकायदेशीर साठा जप्त

विदेशी सिगारेटचा बेकायदेशीर साठा जप्त

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यात बेकायदेशीररित्या विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्याविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोहीम उघडली आहे. एलसीबीच्या पथकाने सांगली, मिरज व विश्रामबाग हद्दीत सात ठिकाणी छापे टाकून १८ हजार रुपयांचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला. याप्रकरणी सातजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झालेल्यांत संभाजी तायाप्पा पाटील (एसटी कॉलनी, संभाजी पान शॉप), राहुल सूर्यवंशी (जामवाडी, आनंद पान शॉप), मुन्ना सिराज पठाण (पत्रकारनगर, डायना पान शॉप), महादेव हणमंत कुकडे (सुभाषनगर, इंटरनेट शॉप), अब्दुल लतिफ कमीम अत्तार ( शनिवार पेठ, मिरज, आत्तार पान शॉप), विठ्ठल तायाप्पा पाटील (विद्याविहार कॉलनी, मंजुषा पान शॉप), बजरंग लक्ष्मण धुमाळ (साईनगर, विनोद पान शॉप) अशी त्यांची नावे आहेत. विदेशी सिगारेट व तंबाखूच्या पाकिटावर सचित्र वैधानिक इशारा नसताना, त्याची विक्री होत आहे. याबाबत पोलीस महासंचालकांनी एका परिपत्रकाद्वारे अशा बेकायदेशीर उत्पादनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी बेकायदेशीर सिगारेट व तंबाखू उत्पादनाच्या विक्रीची गोपनीय माहिती जमा करून कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाचे निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी पथके तयार केली. या पथकांनी सांगली, मिरज, विश्रामबाग हद्दीत सात पान दुकानांवर छापे टाकून १७ हजार ८६९ रुपये किमतीचा बेकायदेशीर सिगारेटचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे, गायकवाड, फौजदार शरद कुरळपकर, राजू कोळी, राजेंद्र नलवडे, अशोक जाधव, मारुती सूर्यवंशी, अरुण टोणे, विजय कोळी, कुलदीप कांबळे, मेघराज रुपनर, जितेंद्र जाधव, दीपक पाटील, अमित परीट, शशिकांत जाधव, विकास भोसले, उदय माळी यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)

विदेशी सिगारेटचा बेकायदेशीर साठा जप्त---एलसीबीची कारवाई : सातजणांवर गुन्हे
सांगली : जिल्ह्यात बेकायदेशीररित्या विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्याविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोहीम उघडली आहे. एलसीबीच्या पथकाने सांगली, मिरज व विश्रामबाग हद्दीत सात ठिकाणी छापे टाकून १८ हजार रुपयांचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला. याप्रकरणी सातजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हे दाखल झालेल्यांत संभाजी तायाप्पा पाटील (एसटी कॉलनी, संभाजी पान शॉप), राहुल सूर्यवंशी (जामवाडी, आनंद पान शॉप), मुन्ना सिराज पठाण (पत्रकारनगर, डायना पान शॉप), महादेव हणमंत कुकडे (सुभाषनगर, इंटरनेट शॉप), अब्दुल लतिफ कमीम अत्तार ( शनिवार पेठ, मिरज, आत्तार पान शॉप), विठ्ठल तायाप्पा पाटील (विद्याविहार कॉलनी, मंजुषा पान शॉप), बजरंग लक्ष्मण धुमाळ (साईनगर, विनोद पान शॉप) अशी त्यांची नावे आहेत.
विदेशी सिगारेट व तंबाखूच्या पाकिटावर सचित्र वैधानिक इशारा नसताना, त्याची विक्री होत आहे. याबाबत पोलीस महासंचालकांनी एका परिपत्रकाद्वारे अशा बेकायदेशीर उत्पादनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी बेकायदेशीर सिगारेट व तंबाखू उत्पादनाच्या विक्रीची गोपनीय माहिती जमा करून कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाचे निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी पथके तयार केली. या पथकांनी सांगली, मिरज, विश्रामबाग हद्दीत सात पान दुकानांवर छापे टाकून १७ हजार ८६९ रुपये किमतीचा बेकायदेशीर सिगारेटचा साठा जप्त केला.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे, गायकवाड, फौजदार शरद कुरळपकर, राजू कोळी, राजेंद्र नलवडे, अशोक जाधव, मारुती सूर्यवंशी, अरुण टोणे, विजय कोळी, कुलदीप कांबळे, मेघराज रुपनर, जितेंद्र जाधव, दीपक पाटील, अमित परीट, शशिकांत जाधव, विकास भोसले, उदय माळी यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Seized illegal cigarettes of foreign cigarettes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.