गुटख्यासह सव्वा अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 PM2021-01-08T17:36:05+5:302021-01-08T17:37:38+5:30
Tobacco Ban Sangli- सुगंधी तंबाखूजन्य पदार्थासह गुटख्याची बेकायदेशीर वाहतुक करून त्याची विक्री करणाऱ्या माधवनगर (जि. सांगली) येथील दोघांना पोलीसांनी अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातील ६ लाख रूपये किंमतीची स्कार्पिओ व ५ लाख २७ हजार ४०० रूपयांचा सुगंधी पानमसाला व गुटखा असा सुमारे ११ लाख २७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विटा : सुगंधी तंबाखूजन्य पदार्थासह गुटख्याची बेकायदेशीर वाहतुक करून त्याची विक्री करणाऱ्या माधवनगर (जि. सांगली) येथील दोघांना पोलीसांनी अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातील ६ लाख रूपये किंमतीची स्कार्पिओ व ५ लाख २७ हजार ४०० रूपयांचा सुगंधी पानमसाला व गुटखा असा सुमारे ११ लाख २७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शुक्रवारी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास विटा पोलीसांनी येथील शिवाजी चौकात कारवाई केली. याप्रकरणी प्रमोद उर्फ रोहित महादेव तहसीलदार (२०, रा. सदलगा, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, सध्या रा. तात्यासाहेब मळा, माधनवगर) व तानाजी वसंत शिंदे (४१, रा. तळेवाडी-करगणी, ता.आटपाडी, सध्या रा. माधवनगर, सांगली) या दोघांना अटक केली.
गुटख्यासारख्या प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री करण्यास मनाई असताना माधवनगर येथील संशयित तहसीलदार व शिंदे हे दोघेजण शुक्रवारी पहाटे ४ वाजता स्कार्पिओ गाडीतून (क्र. एम.एच.-१०-बीए-११४४) मधून गुटखा, केसरयुक्त विमल पान मसाला,सॅफरन ब्लेंडेड, आरएमडी यासह अन्य गुटखा विक्रीसाठी घेऊन विट्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना मिळाल्यानंतर उपअधिक्षक अकुंश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा येथील शिवाजी चौकात नाकाबंदी केली.
त्यावेळी पहाटे सव्वा चार वाजता स्कार्पिओ गाडी येताच पोलीसांनी ती थांबवून झडती घेतली असता गाडीत ५ लाख २७ हजार ४०० रूपयांचा सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा सापडला. त्यामुळे पोलीसांनी ६ लाख रूपयांची गाडी व ५ लाख २७ हजार ४०० रूपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असा सुमारे ११ लाख २७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रमोद उर्फ रोहित तहसीलदार व तानाजी शिंदे या दोघांना अटक केली.
विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एम. टी. मल्याळकर, सुजीत देवराय, अमर सूर्यवंशी, नवनाथ देवकाते, पुंडलिक कुंभार, अभिजीत वाघमोडे, रवींद्र पवार, गणेश कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.