महाडिक अभियांत्रिकीच्या १४२ विद्यार्थ्यांची प्लेसमेंटमधून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:23 AM2021-01-02T04:23:09+5:302021-01-02T04:23:09+5:30

इस्लामपूर : व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १४२ विद्यार्थ्यांची वर्षभरात कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाली. यामध्ये इन्फोसिसमध्ये ...

Selection of 142 students of Mahadik Engineering from placement | महाडिक अभियांत्रिकीच्या १४२ विद्यार्थ्यांची प्लेसमेंटमधून निवड

महाडिक अभियांत्रिकीच्या १४२ विद्यार्थ्यांची प्लेसमेंटमधून निवड

Next

इस्लामपूर : व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १४२ विद्यार्थ्यांची वर्षभरात कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाली. यामध्ये इन्फोसिसमध्ये १, ग्रेऍटम मुंबईमध्ये ५, सॅनकी सोल्युशन्समध्ये १, झेनसॉफ्ट आयटी सर्व्हिसेसमध्ये १ ,धूत ट्रान्समिशनमध्ये २१, ईस्टसन इलेक्ट्रॉनिक्समध्ये २१, डी.एक्स.सी.टेक्नॉलॉजीमध्ये १, अडविक हायटेकमध्ये १९, फिटवेलमध्ये ५३,पॉलिरबमध्ये १५, क्यूस्पायडरमध्ये ३, हेक्सावेअरमध्ये १ असा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव राहुल महाडिक, कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी, प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे यांनी अभिनंदन केले.

राहुल महाडिक म्हणाले, महाविद्यालयाचा नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध विषयांच्या ट्रेनिंग्ज, तसेच प्लेसमेंटमध्ये महाविद्यालय आघाडीवर आहे. यावर्षीही कॅम्पस प्लेसमेंटची परंपरा जपत अंतिम वर्षांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचीही नामांकित कंपन्यांत झालेली निवड अभिनंदनीय आहे. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’चा विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी फायदा होत असून, महाविद्यालयाच्या ‘इंटर्प्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल’ अंतर्गतही विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांनी दिली. या उपक्रमांच्या संयोजनामध्ये ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले.

फोटो : ०१ इस्लामपूर १

ओळी : पेठ येथील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात नामवंत कंपन्यांत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे, उपप्राचार्य प्रा. नीलेश साने, प्रा. इम्रान इनामदार उपस्थित होते.

Web Title: Selection of 142 students of Mahadik Engineering from placement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.