आरआयटीमधील ४२ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:45+5:302021-07-02T04:18:45+5:30
इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नाॅलॉजीच्या बी. टेक. इंजिनिअरिंगमधील शेवटच्या वर्षामध्ये शिकणाऱ्या ४२ विद्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखतीतून विविध ...
इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नाॅलॉजीच्या बी. टेक. इंजिनिअरिंगमधील शेवटच्या वर्षामध्ये शिकणाऱ्या ४२ विद्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखतीतून विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही कॉम्प्युटर सायन्स अॅॅन्ड आय. टी. विभागाच्या मुलांची सर्वाधिक निवड झाली आहे. या निवड झालेल्या मुलांमधील १० मुलांना वार्षिक सहा लाखांहून अधिकचे पॅकेज मिळाले आहे. यावर्षीचे सरासरी पॅकेज हे पावणेचार लाख रुपये इतके आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड आय. टी. विभागाकडून प्रा. एम. एन. मुल्ला, प्लेसमेंट समन्वयक डॉ. ए. पी. शाह, प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. ए. सी. अडमुठे, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. आर. डी. सावंत, महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.