महाडिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:26 AM2021-04-08T04:26:33+5:302021-04-08T04:26:33+5:30
पेठ : श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजनिअरिंगच्या ३२ विद्यार्थ्यांची नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड ...
पेठ : श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजनिअरिंगच्या ३२ विद्यार्थ्यांची नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली.
यामध्ये क्यु स्पायडर्स प्रा. लि. पुणे कंपनीत २३, जस्ट डायल कंपनीमध्ये ३, सायबर सक्सेस कंपनीमध्ये ३, वॉलस्टार प्रा. लि. मध्ये १, एस.डी.एल.सी. नोएडा, झोर्ट नूडसेनमध्ये १ अशी कॅम्पस मुलाखतीद्वारे प्लेसमेंट झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव राहुल महाडिक, कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी, प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे यांनी अभिनंदन केले.
व्यवसायाभिमुख तंत्रशिक्षणाबरोबरच नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार तसेच महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येत असणाऱ्या ‘प्रोजेक्ट बेस्ट लर्निंग’ व ‘कॉन्टिटेटिव्ह ॲप्टीट्यूड लॉजिकल रिझनिंग’सारख्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी फायदा झाला. विविध विषयांच्या ट्रेनिंग प्रोग्रामबरोबरच महाविद्यालयाने प्लेसमेंटसाठी भार दिला आहे. म्हणूनच अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगल्या नोकरीची संधी मिळत आहे. महाविद्यालयाने प्लेसमेंटची परंपरा यंदाही जपली आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांनी दिली. या उपक्रमांच्या संयोजनामध्ये प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. अमोल पाटील, समन्वयक प्रा. सुप्रिया शेटे यांनी परिश्रम घेतले.