उमा हॉस्पिटल, रिसर्च सेंटरची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:47+5:302021-07-12T04:17:47+5:30
जत : आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्य निर्माण व्हावे, याकरिता महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार ...
जत : आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्य निर्माण व्हावे, याकरिता महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मनुष्यबळ उपलब्ध मार्गदर्शन केंद्र म्हणून जत येथील डॉ. रवींद्र आरळी यांचे उमा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उमा हॉस्पिटल व रिसर्च सेंटर या संस्थेला मान्यता मिळाली आहे. तसेच मुख्यमंत्री महारोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता निवड झाली आहे. यामध्ये जनरल ड्यूटी असिस्टंट या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने नुकतेच करण्यात आले. यावेळी डॉ. रवींद्र आरळी, रमेश कोळी, स्वप्नील सुर्वे, रोहित सांगोलकर उपस्थित होते.
110721\img-20210710-wa0044.jpg
उमा हॉस्पिटल व रिसर्च सेंटरला कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता निवड