स्वखर्चाने टँकर, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2016 12:25 AM2016-02-17T00:25:06+5:302016-02-17T00:43:40+5:30

जयंत पाटील यांचा वाढदिवस : कासेगाव, ओझर्डे, पेठ येथे विविध उपक्रम

Self-interest tanker, distribution of food to students | स्वखर्चाने टँकर, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

स्वखर्चाने टँकर, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

Next

कासेगाव / पेठ : कासेगाव (ता. वाळवा) या आ. जयंत पाटील यांच्या मूळ गावी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामबापू शिक्षण व उद्योग सेवक संघ, जयंत सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. गावातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.जि़ प़ चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच सौ़ नंदाताई पाटील यांच्याहस्ते ७00 विद्यार्थ्यांना लाडू व चिवड्याचे वाटप केले. याप्रसंगी हणमंत मिसाळ, सौ़ शांताबाई वगरे, सौ़ सई सोनटक्के, सौ़ तनुजा माने, सेवक संघाचे प्रा़ कृष्णा मंडले, बाळासाहेब गावडे, एम. जे. पाटील, जे़ एस़ पाटील, राजेंद्र चव्हाण, सचिन तोडकर उपस्थित होते़ जयंत सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष शंकर गावडे, अध्यक्ष संभाजी पाटील यांच्याहस्ते आश्रमशाळा, मूकबधिर शाळा व सर्वोदय वसतिगृह, सर्व अंगणवाड्यांतील ६00 विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संचालक रज्जाक मुल्ला, राम वगरे, अविनाश तोडकर, सुनील पाटील, उदय पाटील उपस्थिती होते. पेठ : ओझर्डे (ता. वाळवा) येथील राष्ट्रवादीचे नेते दिनकरराव पाटील यांचे सुपुत्र, उद्योजक पृथ्वीराज पाटील यांनी पावसाळा सुरु होईपर्यंत गावासाठी टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पावसाळा सुरु होईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण मोहिते, भगवानदादा पाटील, दादासाहेब पाटील, सरपंच महादेव गायकवाड, जयवंत पाटील, हणमंत पाटील, संभाजी पाटील, मधुकर पाटील, अविनाश सूर्यगंध, मुरलीधर सूर्यगंध, जगन्नाथ कांबळे यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Self-interest tanker, distribution of food to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.