भाजपच्या बदनामीविरोधात ३१ रोजी आत्मक्लेष आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:19+5:302020-12-23T04:24:19+5:30

सांगली : महापालिकेच्या सत्तेसाठी भाजपने जुन्या सत्ताधीशांना पक्षात घेतले. भाजपच आता काँग्रेसमय झाला असून, नव्यांच्या नादाने जुने भाजपवालेही आता ...

Self-torture agitation on 31st against BJP's notoriety | भाजपच्या बदनामीविरोधात ३१ रोजी आत्मक्लेष आंदोलन

भाजपच्या बदनामीविरोधात ३१ रोजी आत्मक्लेष आंदोलन

Next

सांगली : महापालिकेच्या सत्तेसाठी भाजपने जुन्या सत्ताधीशांना पक्षात घेतले. भाजपच आता काँग्रेसमय झाला असून, नव्यांच्या नादाने जुने भाजपवालेही आता भ्रष्टाचारी झाले आहेत. त्यामुळे पक्षाची रोज बदनामी होत आहे. याविरोधात ३१ डिसेंबररोजी राम मंदिर चौकात आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे वि. द. बर्वे यांनी सांगितले.

बर्वे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपमध्ये नव्याने आलेल्या जुन्या सत्ताधीशांच्या संगतीत जुने भाजपवालेही बिघडले आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांच्या नादी लागून सारेच कारभारी भ्रष्ट झाले आहेत. अशाप्रकारे कारभार करून दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी यांच्यासह आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी उभा केलेला भाजप भ्रष्टाचाराच्या खाईत लोटला आहे. त्यामुळे रोज पक्षावर आरोप होत आहे. याची खंत वा खेद विद्यमान पक्षश्रेष्ठींना नाही. उलट या कारभाराचे समर्थनच केले जात आहे. त्यामुळे आता भाजप सुधारण्याची सुतराम शक्यता नाही. भाजपला सुबुध्दी दे, यासाठी प्रभू रामचंद्रालाच आता साकडे घालणार असून, ३१ डिसेंबरला राम मंदिरबाहेर एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.

Web Title: Self-torture agitation on 31st against BJP's notoriety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.