कचऱ्याचे ढीग हटवून सांगलीत साकारला सेल्फी पाँईंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 04:53 PM2018-11-06T16:53:58+5:302018-11-06T17:04:35+5:30

स्वच्छ सांगली,सुंदर सांगली' संकल्पनेचा निर्धार करून १ मे महाराष्ट्र दिनापासून स्वच्छता यात्रा ही मोहीम राबविणा-या निर्धार संघटनेच्यावतीने सांगली शहरात पहिल्यांदाच सेल्फी पाँईट साकारण्यात आला. कचऱ्याचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रुपडे या उपक्रमातून पालटले आहे.

Selfie pointe has been destroyed by removing the pile | कचऱ्याचे ढीग हटवून सांगलीत साकारला सेल्फी पाँईंट

कचऱ्याचे ढीग हटवून सांगलीत साकारला सेल्फी पाँईंट

Next
ठळक मुद्देसांगली शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच उपक्रमनिर्धार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे महापालिकेकडून कौतुकआयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते उद्घाटन

सांगली : स्वच्छ सांगली,सुंदर सांगली' संकल्पनेचा निर्धार करून १ मे महाराष्ट्र दिनापासून स्वच्छता यात्रा ही मोहीम राबविणा-या निर्धार संघटनेच्यावतीने सांगली शहरात पहिल्यांदाच सेल्फी पाँईट साकारण्यात आला. कचऱ्याचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रुपडे या उपक्रमातून पालटले आहे.

या पॉईंटचे उद्घाटन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी सेल्फी काढून निर्धार संघटनेचे कौतुक केले.उपस्थित महिलांनी दीपप्रज्वलन केले.


यावेळी आयुक्त खेबुडकर म्हणाले की,सांगली शहरात पहिल्यांदाच राकेश दड्डणावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेल्फी पाँईट ची राबवलेली संकल्पना अतिशय सुंदर आहे. गेल्या ६ महिन्याहून अधिक दिवस हे तरूण शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी झटत आहेत. सेल्फी पाँईट सारख्या संकल्पना राबवून निर्धार संघटनेने खूप छान काम केले आहे. त्यांच्या कार्यातीत सातत्य कौतुकास्पद असून नागरिकांनी देखील अशा मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.


निर्धार संघटनेचे अध्यक्ष राकेश दड्डणावर म्हणाले की,आजची तरूणाईत सेल्फीचे किती वेड आहे हे सर्वांना माहित आहे. सेल्फी घेण्यासाठी तरूणाईंना एक ठिकाण उपलब्ध होऊन त्यांना त्यांचा आनंद मिळवून द्यावा व शहराच्या सौंदर्यात एका गोष्टीची भर पडवी यासाठीच सांगली शहरात पहिल्यांदाच ही संकल्पना निर्धार संघटनेच्या वतीने राबविण्यात आली आहे.

सांगली शहरातील दक्षिण शिवाजीनगर येथील गलिच्छ परिसराची स्वच्छता करून त्याठिकाणी सेल्फी पाँईट साकारण्यात आले.आहे. यामध्ये विविध वस्तूंनी सदर ठिकाण सजवून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यापुढे शहरातील विविध ठिकाणी अशाच पद्धतीचे सेल्फी पाँईट साकारण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांनी या सेल्फी पाँईट ला एकदा अवश्य भेट द्यावी.



निर्धार संघटनेच्या "सेल्फी पाँईट" या संकल्पनेचे नागरिकांतून कौतुक होत आहे.सेल्फीसाठी नागरिकांची गर्दी.
यावेळी प्रदीप सुतार, रवींद्र शिंदे, विकास जाधव, विजय पाटील, शुभम जाधव, बसवराज पाटील, संकेत आलासे, प्रकाश कोट्याळ, रविंद्र वडेर, सतिश कट्टीमणी, अनिल अंकलखोपे, सुनील पाटील, रोहीत कोळी,
व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते..

Web Title: Selfie pointe has been destroyed by removing the pile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.