‘रयत क्रांती’च्या पेरणीला अर्थचिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:30 AM2017-09-25T00:30:07+5:302017-09-25T00:30:07+5:30

Semantics on the sowing of 'Ryat Kranti' | ‘रयत क्रांती’च्या पेरणीला अर्थचिंता

‘रयत क्रांती’च्या पेरणीला अर्थचिंता

Next



अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून रणशिंग फुंकल्यानंतर आता दसºयाच्या मुहूर्तावर होणाºया पहिल्याच मेळाव्याची तयारी करताना आर्थिक अडचणींचा सामना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना करावा लागणार आहे. यासाठीच्या पेरणीकरिता उद्योजकमित्र आणि काही नेत्यांना त्यांनी मदतीची हाक दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याला अद्याप दुजोरा मात्र कोणाकडून मिळालेला नाही.
इचलकरंजी येथे होणाºया शेतकरी मेळाव्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. राज्यातील माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, विनय कोरे आदी बड्या नेत्यांसह काही नेत्यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्ष चालविण्यासाठी आर्थिक ताकदही असावी लागते. खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ऊस उत्पादकांच्या आर्थिक मदतीवर स्वाभिमानी संघटनेला सक्षम केले होते. प्रारंभीच्या काळात प्रत्येक सभेच्या ठिकाणी आर्थिक मदत मिळण्यासाठी डबे ठेवले जात होते. त्यामध्ये शेतकरी स्वखुशीने पैसे टाकत होते. परंतु आता हे दोघेही शेतकरी नेते एकमेकांपासून दुरावले आहेत. त्यामुळे ‘एक नोट एक वोट’ हा त्यांचा नारा हवेतच विरला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी साखर कारखानदारांनी उसाला चांगला दर दिला आहे, तर आगामी गळीत हंगामासाठी किमान ३२00 ते ३५00 रुपयांपर्यंत उसाला दर मिळणार असल्याने, आता शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाची गरजच नाही. साखरसम्राटांनीच चांगला दर देऊन शेतकरी संघटनेला थोपविण्याचा प्रयत्न केला आहे.
एकेकाळी शेट्टी-खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळीसाठी रयतेकडूनच पैसा गोळा केला. अलीकडच्या राजकारणात नेत्यांना गर्दी खेचण्यासाठी पैशाचा मोठा वापर करावा लागतो. काही ठिकाणी तर पैसे देऊन लोकांना सभा, मेळाव्याला आणावे लागते. हे तंत्र अनेकांनी अवलंबिले आणि पदरात यश घेतले.
पक्ष, संघटना चालवण्यासाठी पैशाची गरज भासते. यापूर्वीही अनेक पक्ष, संघटनांना आर्थिक बळ न मिळाल्याने ते पक्ष आणि संघटना प्रभावी काम करु शकले नाहीत.
सदाभाऊंनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेचा पहिलाच शेतकरी मेळावा दसºयाच्या मुहूर्तावर इचलकरंजी येथे होत आहे. या मेळाव्याला ३0 हजारहून अधिक शेतकरी जमविण्याचा निर्धार मंत्री खोत यांनी केला आहे. यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वाळवा-शिराळ्यातून मोठ्या प्रमाणात शेतकºयांना नेण्यासाठी त्यांनी काही उद्योजक आणि राजकीय नेत्यांना मदतीची साद घातल्याचे समजते.
मेळाव्यातील घोषणेकडे सर्वांचे लक्ष
इचलकरंजी मेळाव्यात, मीच ठरवेन तो ऊसदर, अशी घोषणा केली आहे. या घोषणेचे भवितव्य काय आणि त्यानंतरची सदाभाऊंची नेमकी वाटचाल कशी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ३० सप्टेंबररोजी रयत क्रांती संघटनेचा मेळावा घेण्यात येत आहे. यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यावेळी ते कोणती भूमिका जाहीर करणार, याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Semantics on the sowing of 'Ryat Kranti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.