ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ यांचे सांगलीत निधन, वयाच्या १०३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By संतोष भिसे | Published: September 15, 2022 06:43 PM2022-09-15T18:43:10+5:302022-09-15T18:44:47+5:30

१९८८ मध्ये कै. राजीव गांधी प्रधानमंत्री असताना "ताम्रपट" देऊन त्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला होता.

Senior freedom fighter Babu Nadaf passed away in Sangli | ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ यांचे सांगलीत निधन, वयाच्या १०३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ यांचे सांगलीत निधन, वयाच्या १०३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सांगली : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू हसन नदाफ (वय १०३) यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, कॅप्टन रामचंद्र लाड, माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील, बर्डे गुरुजी यांच्या सोबत सांगली जिल्ह्यात क्रांतिकारकांची फौज उभी राहिली. त्या तुफान सेनेतील एक क्रांतिकारक म्हणजे बाबू हसन नदाफ. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावातील एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील जन्माला आलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ हे गांधीजी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने भारावून जाऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते.

शेनोळी येथे रेल्वे लुटणे होत असताना गोळीबार झाला त्यावेळी पोलिसांना चकवा देऊन पळताना  बाबू नदाफ आणि त्यांचे सहकारी बापू शेवाळे हे दोघे जखमी झाले. श्री बाबू नदाफ यांना पायाला गोळी लागली त्यामुळे जखमी असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. कोल्हापूरला जेलमध्ये नेहत असताना वॉन्टेड क्रांतिकारक जिवंत पकडला म्हणून बक्षिसांची रक्कम पोलिसांनी त्यांच्या अंगावर उधळून आनंद साजरा केला होता.

१९८८ मध्ये कै. राजीव गांधी प्रधानमंत्री असताना "ताम्रपट" देऊन त्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने ही त्यांचा सन्मान केला आहे. काही महिन्यांपूर्वी सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस या नवीन रेल्वे गाडीचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन ही बाबू नदाफ यांच्याहस्ते करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी शासनाच्या वतीने त्यांचा तासगाव येथे सन्मानही करण्यात आला.

Web Title: Senior freedom fighter Babu Nadaf passed away in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.