ज्येष्ठ पत्रकार महावीर मव्दाण्णा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:24 AM2020-12-24T04:24:01+5:302020-12-24T04:24:01+5:30
गेली पन्नास वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. मराठी साहित्यातील नामांकित अशा चौफेर दिवाळी अंकाचे ते संपादक होते. भिलवडी ...
गेली पन्नास वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. मराठी साहित्यातील नामांकित अशा चौफेर दिवाळी अंकाचे ते संपादक होते. भिलवडी ग्रामपंचायतीचे सदस्य, भिलवडी दक्षिण भाग विकास सोसायटीचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, विष्णूआण्णा पाटील, डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते. रब्बी शाळू व गहू पिकाचे विक्रमी उत्पादन घेणारे ते प्रयोगशील शेतकरी होते. त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने ‘प्रयोगशील शेतकरी’ पुरस्कार देण्यात आला होता. २००३ ला क्षितिज समूह व भिलवडी ग्रामस्थांच्यावतीने त्यांना ‘भिलवडी भूषण पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. चौफेर क्रिएशन सांगली या जाहिरात कंपनीचे अमोल मव्दाण्णा यांचे ते वडील होत.
फोटो-२३महावीर मव्दाण्णा निधन