पैसे देऊन कोरोनाची लस घेण्यातही ज्येष्ठ पुढेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:47 AM2021-03-13T04:47:20+5:302021-03-13T04:47:20+5:30
सांगली : कोराेना लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्यातील ज्येष्ठांनी आघाडी घेतली असून, एकूण लसीकरणामध्ये २२ टक्के लसीकरण ज्येष्ठांचे झाले आहे. शासकीय ...
सांगली : कोराेना लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्यातील ज्येष्ठांनी आघाडी घेतली असून, एकूण लसीकरणामध्ये २२ टक्के लसीकरण ज्येष्ठांचे झाले आहे. शासकीय रुग्णालयासह पैसे भरून खासगी रुग्णालयात लस घेण्यातही ज्येष्ठ पुढे आहेत.
सांगली जिल्ह्यात खासगी व शासकीय रुग्णालयांमधून लसीकरणाची मोहीम सध्या सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ज्येष्ठांचे तसेच ४५ ते ६० या मध्यम वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू आहे. यामध्ये ज्येष्ठांमधील लसीकरणाला मिळालेला उत्स्फूर्तपणा स्पष्टपणे दिसून आला. आरोग्य विभागानेही ही बाब नमूद केली आहे. महापालिका क्षेत्रापेक्षा ग्रामीण भागातील ज्येष्ठांचा प्रतिसाद अधिक आहे.
अन्य वयोगटापेक्षा ज्येष्ठ एक पाऊल पुढे
जिल्ह्यात आजअखेर ४५ ते ६० या वयोगटातील एक हजार ८१८ लोकांनी लस घेतली आहे. या वयोगटातील २०९ लोकांनी खासगी रुग्णालयात लस घेतली. तुलनेने ज्येष्ठांचे लसीकरण् ११ हजार ३७८ इतके झाले आहे. खासगी रुग्णालयात यातील ६४५ ज्येष्ठांनी लस घेतली. त्यामुळे अन्य वयोगटापेक्षा ज्येष्ठांचे एक पाऊल पुढे आहे.
कोट
कोरोनापासून बचावासाठी लस घेणे महत्त्वाचे आहे. मी लस घेतली. मला कोणताही त्रास झालेला नाही. अन्य लोकांनीही घ्यावी.
-सुधीर नाईक, मिरज
कोट
लसीकरणाने कोणताही त्रास झाला नाही. कोरोनापासून आपले व आपल्या कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी लस घेतली.
-सुमती नाईक, मिरज
कोट
प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून लस घ्यायला हवी. ज्येष्ठांनी अधिक सतर्कता दाखविली आहे. ६० वर्षांवरील सर्व लोकांनी लसीकरण करून घ्यावे. संबंधित लसीकरण केंद्रांवर आता सायंकाळी ६ वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ वाढविली आहे. स्वत:सह समाज सुरक्षित करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.
- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
११,३७८ ज्येष्ठांनी लस घेतली
रुग्णालयात
खासगी ६४५
शासकीय १०,७६३
वयानुसार
ज्येष्ठ
११,३७८
इतर
१८१८