कुपवाड शहरासाठी स्वतंत्र शववाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:27+5:302021-01-17T04:23:27+5:30
कुपवाड : महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आतापर्यंत कुपवाड शहरासाठी स्वतंत्र शववाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे कुपवाडकरांना शववाहिकेसाठी वाट पाहत बसावे लागत ...
कुपवाड : महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आतापर्यंत कुपवाड शहरासाठी स्वतंत्र शववाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे कुपवाडकरांना शववाहिकेसाठी वाट पाहत बसावे लागत होते. आता नगरसेवक गजानन मगदूम यांच्या प्रयत्नामुळे कुपवाड शहरासाठी २२ वर्षांनंतर स्वतंत्र शववाहिका मंजूर करण्यात आली आहे.
शहरातील विस्तारित भागातील नागरिकांना सांगली अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जावे लागते. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून सांगली व मिरजेसाठी स्वतंत्र शववाहिकेची सोय आहे. परंतु, कुपवाड शहरासाठी स्वतंत्र शववाहिका नव्हती. त्यामुळे कुपवाडकरांना अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. नगरसेवक मगदूम यांनी स्थायी समिती सभेत दोन शववाहिका मंजुरीमधील एक स्वतंत्र शववाहिका कुपवाड शहराला देण्यात यावी, अशी मागणी केली होती.
या पाठपुराव्यामुळे स्वतंत्र शववाहिका कुपवाडसाठी मंजूर झाली आहे.
यासाठी आ. सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, आयुक्त नितीन कापडणीस, तत्कालीन स्थायी समिती सभापती संदीप आवटी, विद्यमान सभापती पांडुरंग कोरे यांचे सहकार्य लाभले.