कारंदवाडीत विलगीकरण केंद्र सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:28 AM2021-05-27T04:28:45+5:302021-05-27T04:28:45+5:30
आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील हरिभाऊ महानवर विद्यालयात विलगीकरण ...
आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील हरिभाऊ महानवर विद्यालयात विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच पद्मजा कबाडे यांनी दिली.
पद्मजा कबाडे म्हणाल्या की, कारंदवाडी, कृष्णानगर व हाळ या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. घरी विलगीकरणात असणारे अनेकजण सुपर स्प्रेडर ठरत आहेत. या सर्वांना घरी विलगीकरणाऐवजी संस्थात्मक किंवा रुग्णालयात उपचार करण्यात यावेत. या दृष्टिकोनातून दक्षता समितीची बैठक झाली.
या बैठकीत महिला व पुरुषांसाठी विलगीकरण कक्ष तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सर्वोदय कारखान्याचे माजी संचालक रमेश ऊर्फ आप्पासाहेब हाके, उपसरपंच माणिक लवटे, ग्रामसेवक सचिन बिरनाळे, तलाठी अभयकुमार उपाध्ये, डॉ. प्रज्ञा खोत, रमेश रसाळ यांच्यासह आशा वर्कर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
फोटो २६ कारंदवाडी / कारंदवाडी (ता. वाळवा) येथील बैठकीत सरपंच पद्मजा कबाडे बाेलत होते. यावेळी रमेश हाके, माणिक लवटे, सचिन बिरनाळे, अभयकुमार उपाध्ये, आदी उपस्थित होते.