जखमी नागावर उपचार : कापरीत सर्पमित्रांनी नागराजाला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 07:37 PM2020-01-28T19:37:45+5:302020-01-28T19:42:22+5:30

कापरी येथे डोंगराजवळ शेतामध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जेसीबीने काम चालू असताना जेसीबीचा नांगर लागून नाग जखमी झाला. याबाबत शिराळा येथील दीपक नांगरे, बंटी नांगरे-पाटील, अक्षय क्षीरसागर या नागप्रेमींना समजताच त्यांनी कापरी येथे घटनास्थळी धाव घेतली व त्या जखमी नागास पशुवैद्यकीय दवाखान्यात शिराळा येथे आणले.

The serpent's friend gave his life to Nagaraja | जखमी नागावर उपचार : कापरीत सर्पमित्रांनी नागराजाला दिले जीवदान

जखमी नागावर उपचार : कापरीत सर्पमित्रांनी नागराजाला दिले जीवदान

Next
ठळक मुद्दे अगदी वेळप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून. त्यामुळे शिराळकरच खरे सर्पमित्र, सर्पप्रेमी म्हणावे लागतील.

विकास शहा


शिराळा : स्वत:चा जीव धोक्यात घालून शिराळकरांनी आजवर अनेकदा नागांचे प्राण वाचविले आहेत. प्राणीप्रेमाची ही परंपरा जपत कापरी (ता. शिराळा) येथे रविवारी दि. २६ जानेवारी रोजी एका नागाला प्राणीमित्रांनी जीवदान दिले. शेतात जेसीबीने काम सुरू असताना जेसीबीचा नांगर लागून जखमी झालेल्या नागावर उपचार करून शिराळकरांनी नागावरील प्रेम आणि श्रद्धा किती आहे हे पुन्हा दाखवून दिले आहे.

कापरी येथे डोंगराजवळ शेतामध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जेसीबीने काम चालू असताना जेसीबीचा नांगर लागून नाग जखमी झाला. याबाबत शिराळा येथील दीपक नांगरे, बंटी नांगरे-पाटील, अक्षय क्षीरसागर या नागप्रेमींना समजताच त्यांनी कापरी येथे घटनास्थळी धाव घेतली व त्या जखमी नागास पशुवैद्यकीय दवाखान्यात शिराळा येथे आणले. घटनेची माहिती वनक्षेत्रपाल एस. आर. काळे यांना दिली. त्यानंतर वनपाल सचिन पाटील, साधू पाटील घटनास्थळी आले. यानंतर या नागावर पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. सुशांत शेणेकर यांनी उपचार केले व नागास वन विभागाच्या ताब्यात दिले.

शिराळकरांनी याअगोदरही नांगरट करताना नांगरात अडकून जखमी झालेले, कूपनलिका-विहिरीत अडकलेले, वाहनांच्या धडकेत जखमी झालेले, कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले अशा अनेक नागांचे प्राण वाचविले आहेत. इतर कोणत्याही ठिकाणी सर्प पहिला की त्यास मारले जाते. मात्र शिराळा येथे सर्प तसेच नागाचा जीव वाचवला जातो. अगदी वेळप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून. त्यामुळे शिराळकरच खरे सर्पमित्र, सर्पप्रेमी म्हणावे लागतील.
 

या नागास मोठी जखम झाली आहे. त्यामुळे काही दिवस जखमेची काळजी घेणे आवश्यक आहे. जखम पूर्ण बरी झाल्यावरच त्यास सुरक्षितस्थळी सोडण्यात येईल. शिराळकरांचे नागावर असणारे प्रेम आणि श्रद्धा वाखाणण्यासारखी आहे.
- एस. आर. काळे, वनक्षेत्रपाल, शिराळा.

 

Web Title: The serpent's friend gave his life to Nagaraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.