सामूहिक आरती करणाऱ्या सात जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 01:04 AM2020-04-13T01:04:19+5:302020-04-13T01:04:33+5:30
रविवारी सकाळी आठ वाजता सहायक पोलीस निरीक्षक इंद्रजित वर्धन हे संचारबंदीची माहिती देत
मिरज (जि. सांगली) : मिरजेत संचारबंदीचे उल्लंघन करीत कुंभारगल्ली परिसरातील गणपती मंदिरात सामूहिक आरती करणाºया सात जणांना मिरज पोलिसांनी अटक केली. सकाळी या मंदिरात घंटा वाजवत आरती सुरू असल्याचे दिसल्याने मंदिराच्या पुजाºयासह दोन पुरुष व पाच वृद्ध महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी सकाळी आठ वाजता सहायक पोलीस निरीक्षक इंद्रजित वर्धन हे संचारबंदीची माहिती देत, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत पोलीस वाहनातून जात असताना, गणपती मंदिरात आरती सुरू होती.