जिल्ह्यातील सव्वाशे पोलिसांना मिळाली पदोन्नती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:08+5:302021-07-10T04:19:08+5:30
सांगली : पोलीस दलात सेवेस असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रतीक्षा असलेल्या पदोन्नतीची प्रतीक्षा अखेर संपली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ...
सांगली : पोलीस दलात सेवेस असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रतीक्षा असलेल्या पदोन्नतीची प्रतीक्षा अखेर संपली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील १२५ पोलिसांना पदोन्नतीचे आदेश दिले.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विविध पदांवरील पोलिसांना पदोन्नती देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू होती. शुक्रवारी अधीक्षक गेडाम यांनी आदेश दिले. त्यानुसार ३५ सहायक पोलीस फौजदार, ४२ हवालदार, ४८ पोलीस नाईक यांना पदोन्नती देण्यात आली. ज्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हे दाखल आहेत, अशांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अशा १० पोलिसांविरोधात फौजदारी गुन्हे व न्यायालयात न्यायप्रविष्ट गुन्हे आहेत. एका पोलीस अंमलदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल असून, तो न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या कर्मचाऱ्याचीही पदोन्नती काढून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात एकाचवेळी सव्वाशे पोलिसांना पदोन्नती मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
चौकट
साईनाथ ठाकूरला बडतर्फीची नोटीस
पदोन्नतीसाठी बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याचे सिध्द झाल्याने साईनाथ जयसिंग ठाकूर याची पदोन्नती काढून घेण्यात आली आहे. शिवाय बनावट प्रमाणपत्रामुळे ठाकूरला सेवेतून बडतर्फ करण्यासाठी नोटीसही देण्यात आली आहे.