सांगलीत सातशे टन बेदाण्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:05+5:302020-12-31T04:27:05+5:30
विनायक हिंगमिरे यांच्या दुकानात राजेंद्र उमरे (कुमठे) यांच्या २३ बॉक्सला प्रतिकिलो १६१ रुपये भाव मिळाला. योगेश कबाडे यांनी खरेदी ...
विनायक हिंगमिरे यांच्या दुकानात राजेंद्र उमरे (कुमठे) यांच्या २३ बॉक्सला प्रतिकिलो १६१ रुपये भाव मिळाला. योगेश कबाडे यांनी खरेदी केला. दरवर्षी जानेवारीमध्ये नवीन मालाची आवक होते. पण यंदा डिसेंबरमध्येच आवक झाली. बुधवारी सौद्यात ३२ दुकानांत सातशे टन (७० गाडी) आवक झाली होती. काही दुकानात उच्च प्रतीच्या जुन्या बेदाण्यास २३६ रुपये उच्चांकी दर मिळाला आहे.
नवीन सौद्याचा प्रारंभ बेदाणा असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोज मालू, विद्यमान अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांच्याहस्ते झाला. यावेळी गुलशन अग्रवाल, विनायक हिंगमिरे, आप्पासाहेब आरवाडे, निर्मल रुणवाल, रवीकुमार हजारे, योगेश कबाडे, नितीन मर्दा उपस्थित होते.
चौकट
बेदाण्यास असा मिळाला भाव
वाण प्रतिकिलो दर
काळा बेदाणा : ३० ते ६० रुपये
साधारण लांब : ८० ते १५०
गोल पिवळा : १०० ते १५०
उच्च प्रतीचा गोल : १६० ते २५०