राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्यावतीने सात हजार पूरग्रस्तांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:29 AM2021-08-13T04:29:58+5:302021-08-13T04:29:58+5:30
डॉक्टर सेलच्यावतीने पूरग्रस्त गावातील आरोग्य शिबिरात रुग्णांची डॉ. अतुल मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर ...
डॉक्टर सेलच्यावतीने पूरग्रस्त गावातील आरोग्य शिबिरात रुग्णांची डॉ. अतुल मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलने वाळवा तालुक्यातील तसेच मिरज तालुक्यातील कृष्णा व वारणा नदीकाठच्या पूरग्रस्त गावांमध्ये आरोग्य शिबिरे घेऊन सात हजार पूरग्रस्तांची तपासणी व उपचार केले. यावेळी तपासणी केलेल्या पूरग्रस्तांना राष्ट्रवादीच्या वेल्फेअर फंड व प्रदेश डॉक्टर सेलकडून औषधे देण्यात आली.
जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, उपाध्यक्ष अतुल मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोळे, नरसिंहपूर, शिरटे, बहे, रेठरेहरणाक्ष, बोरगाव, मसूचीवाडी, बनेवाडी, साटपेवाडी, गौंडवाडी, शिरगाव, वाळवा, शिगाव, माळवाडी, दूधगाव, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज आदी गावांमध्ये ही आरोग्य शिबिरे घेतली.
डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अतुल मोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. अनिल माळी, शहराध्यक्ष डॉ. दिलीप साळुंखे, डॉ. सुनील पाटील, डॉ. अमित सूर्यवंशी, डॉ. विनय राजमाने, डॉ. नाना कचरे, डॉ. गणेश कारंडे, डॉ. सुभाष भांबुरे, डॉ. संतोष खोत व सहकाऱ्यांनी पूरग्रस्तांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. पुणे जिल्ह्यातील डॉक्टर सेलचे डॉ. किरण थोरात व त्यांचे सहकारीही या शिबिरात सहभागी झाले होते.
या शिबिरांसाठी पंचायत समितीचे उपसभापती नेताजीराव पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, कार्तिक पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक माणिक पाटील, अभिजित पाटील, कृष्णेचे संचालक जे. डी. मोरे, उमेश पवार, विनायक यादव यांनी परिश्रम घेतले. तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील यांनी या शिबिरांचे संयोजन केले.