कोयना विभागात गुरुवारी वाळूचे सात ट्रक पकडले

By admin | Published: June 23, 2017 12:59 AM2017-06-23T00:59:40+5:302017-06-23T00:59:40+5:30

महसूलची कारवाई : साडेआठ लाख रुपये दंड

Seven trucks seized on Thursday in the Koyna section | कोयना विभागात गुरुवारी वाळूचे सात ट्रक पकडले

कोयना विभागात गुरुवारी वाळूचे सात ट्रक पकडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : कोयना विभागातील शिरळ व गाढखोप गावच्या हद्दीतून बेकायदेशीरपणे वाळू व माती वाहतूक करणाऱ्या १४ ट्रकवर पाटणच्या महसूल विभागाने दोन दिवसांपूर्वी धडक कारवाई केली होती. या कारवाईत पकलेल्या ट्रकमालकांना सुमारे ८ लाख ५६ हजार २३७ रुपयांचा दंड करण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून, या दंडात्मक कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, गुरुवार, दि. २२ रोजी आणखी सात ट्रकवर पाटण महसूल विभागाकडून कारवाई केली असून, त्यांच्यावरही दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसीलदार रामहरी भोसले यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, कऱ्हाड-चिपळूण राज्य मार्गावरील शिरळ व गाढखोप गावच्या हद्दीतून बेकायदेशीर वाळू व माती वाहतूक करणाऱ्या १४ ट्रकवर महसूल विभागाने दोन दिवसांपूर्वी कारवाई केली. यावेळी पकडण्यात आलेल्या ट्रक चालकांवर नियमापेक्षा जास्त वाळूची वाहतूक व परवाना संपलेल्या तारखेनंतर वाळू वाहतूक केल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या दंडात्मक कारवाईत ट्रक क्रमांक एम. एच. ५० एन. ६६८२ ( ९२ हजार ९२५), एम. एच. ५०/७७७४, ( ९२ हजार ९२५), एम. एच. ५०/0९९९, (९२ हजार ९२५), एम. एच. ४३ वाय १८० (३९ हजार ८२५), एम. एच. १० झेड ४६११ (३९ हजार ८२५), एम. एच. ४३ वाय. १२७१ (९२ हजार ९२५), एम. एच. 0९ एल. ६५४१ (३९ हजार ८२५), एम. एच. १२ एचडी ९७४४ (३९ हजार ८२५), एम. एच. 0४ बी. जी. १७२७ (३९ हजार ८२५), एम. एच. १० बी. आर. ७६६६ (३९ हजार ८२५), एम. एच. १० बी. आर. ७४४४ (३८ हजार ८२५), एम. एच. १० ए. डब्ल्यू १२२१ (३९ हजार ८२५), एम. एच. १० बी. आर. ९४४४ (३९ हजार ८२५), एम. एच. १० झेड ४८४३ (१ लाख २६ हजार ११२) अशा एकूण १४ ट्रकवर महसूल विभागाने ८ लाख ५६ हजार २३७ रुपयांचा दंड करण्यात आला. पाटण तालुक्यातील या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
 

Web Title: Seven trucks seized on Thursday in the Koyna section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.