‘म्हैसाळ’साठी सतरा कोटींची अट सिंचन व्यवस्थापन विभागाचा निर्णय : २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:20 AM2018-01-25T00:20:29+5:302018-01-25T00:20:35+5:30

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ७१ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, ३४ कोटींचे वीज बिल थकीत आहे. योजना सुरू करण्यासाठी शेतकºयांनी १७ कोटी १० लाख रुपये भरले,

 Seventeen crores for the 'Mhaysal' Decision Management Department's decision: Recovery Campaign from January 9 to February 15 | ‘म्हैसाळ’साठी सतरा कोटींची अट सिंचन व्यवस्थापन विभागाचा निर्णय : २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत वसुली मोहीम

‘म्हैसाळ’साठी सतरा कोटींची अट सिंचन व्यवस्थापन विभागाचा निर्णय : २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत वसुली मोहीम

Next

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ७१ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, ३४ कोटींचे वीज बिल थकीत आहे. योजना सुरू करण्यासाठी शेतकºयांनी १७ कोटी १० लाख रुपये भरले, तरच म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु होणार आहे. म्हणूनच म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांनी दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी कालावधित वसुलीची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांच्या वीजबिलांचा प्रश्न गंभीर बनला होता. थकित बिलापोटी तिन्ही योजना आॅक्टोबर २०१७ पासून बंद राहिल्या. थकबाकी भरल्याशिवाय योजना सुरु होणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. म्हैसाळ योजनेचा मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांना लाभ होतो. योजनेत १७१ गावांचा समावेश असून, ८२ हजार ९२२ हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. सध्या ३६ हजार ६३५ हेक्टरवरील शेती पाण्याखाली आली आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात द्राक्ष आणि डाळिंबाची पिके मोठ्या प्रमाणात आहेत. योजनेची पाणीपट्टी ७१ कोटी, तर ३४ कोटी ४९ लाख रुपये वीजबिल थकित आहे. योजना तात्काळ चालू करण्यासाठी १७ कोटी १० लाख भरावे लागणार आहेत.

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी पिके करपू लागल्याने शेतकºयांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाणी चालू करण्याची मागणी जोर धरत असली तरी, पाणीपट्टी भरल्याशिवाय योजना सुरू केली जाणार नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे. टंचाईच्या निधीतील शिल्लक रक्कम साडेसहा कोटी रुपये जमा झाले आहेत. परंतु उर्वरित रक्कम शेतकºयांना भरावी लागणार असल्याचे अटळ आहे.

अधिकाºयांनी म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रात दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधित पाणीपट्टी वसुलीची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधित वसुली झाली तरच, म्हैसाळ योजना चालू होणार आहे, अन्यथा आवर्तन चालू होण्याची अपेक्षा फारच कमी आहे. परिणामी मिरज पूर्व, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील पिके अडचणीत सापडणार आहेत. विशेषत: द्राक्ष, डाळिंब बागांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. यासाठी राजकारण बाजूला ठेवून शेतकºयांच्या हितासाठी पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

सहकार्य करावे : सूर्यकांत नलवडे
वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके धोक्यात आली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने आतापर्यंत थकीत वीज बिल भरण्यासाठी सहकार्य केले होते. त्यानुसार दोनवेळा पाणी योजना सुरु झाल्या आहेत. सध्या म्हैसाळ योजनेचे ३४ कोटींपर्यंत वीज बिल थकित असून, महावितरण कंपनीने किमान १७ कोटी १० लाखांपर्यंतची रक्कम भरण्याची सूचना केली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी म्हैसाळ योजनेचा निश्चित फायदा होणार आहे. म्हणूनच शेतकºयांनी पाणीपट्टी भरल्यास लगेच म्हैसाळ योजना सुरू करणे शक्य होणार आहे, असे आवाहन म्हैसाळ पाणी व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी यांनी केले आहे. तसेच यासाठीच म्हैसाळ योजनेकडील वसुलीसाठी दि. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी कालावधित विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन पाणीपट्टीची रक्कम भरुन सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title:  Seventeen crores for the 'Mhaysal' Decision Management Department's decision: Recovery Campaign from January 9 to February 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.