मिरजेत महापालिका आवारात सांडपाणी ओतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:29 AM2021-03-09T04:29:48+5:302021-03-09T04:29:48+5:30
मिरज : मिरजेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहतीत ड्रेनेज यंत्रणेत बिघाड होऊन सांडपाणी रस्त्यावर आले आहे. याबाबत उपाययोजना होत नसल्याने ...
मिरज : मिरजेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहतीत ड्रेनेज यंत्रणेत बिघाड होऊन सांडपाणी रस्त्यावर आले आहे. याबाबत उपाययोजना होत नसल्याने शिवसेनेने महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत महापालिका आवारात सांडपाणी ओतले.
प्रभाग २० मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वसाहतीत गेली अनेक वर्षे ड्रेनेज निचऱ्याची गंभीर समस्या असून येथे ड्रेनेज वाहिनीतील सांडपाणी नागरिकांच्या घरात जात आहे. येथे नेहमीच ड्रेनेजच्या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन याबाबत उपाययोजना करत नसल्याने सोमवारी शिवसेनेने स्थानिक नागरिकांसोबत महापालिकेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी शिवसेना कामगार नेते डॉ. महेशकुमार कांबळे, शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यासह अण्णाभाऊ साठेनगर वसाहत येथील महिलांनी सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या खुर्चीला हार घातला. महापालिकेच्या आवारात ड्रेनेजचे पाणी ओतून ड्रेनेज निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी होत्या.