शब्दरंग-डोंगरी साहित्य परिषदचे पुरस्कार जाहीर, फेब्रुवारीत साहित्य संमेलनामध्ये होणार वितरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 07:01 PM2023-01-12T19:01:06+5:302023-01-12T19:05:06+5:30

गंगाराम पाटील  वारणावती : शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळ व डोंगरी साहित्य परिषदेच्या वतीने २०२० ते २०२२ चे उत्कृष्ठ ...

Shabdarang-Dongri Sahitya Parishad awards announced, awards to be distributed at Sahitya Samelan to be held in February | शब्दरंग-डोंगरी साहित्य परिषदचे पुरस्कार जाहीर, फेब्रुवारीत साहित्य संमेलनामध्ये होणार वितरण

शब्दरंग-डोंगरी साहित्य परिषदचे पुरस्कार जाहीर, फेब्रुवारीत साहित्य संमेलनामध्ये होणार वितरण

googlenewsNext

गंगाराम पाटील 

वारणावती : शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळ व डोंगरी साहित्य परिषदेच्या वतीने २०२० ते २०२२ चे उत्कृष्ठ साहित्य निर्मिती चे डोंगरी साहित्य पुरस्काराची आज घोषणा परिषदेचे अध्यक्ष कवी वसंत पाटील, उपाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी  केली. पद्यविभागात शब्दरंग डोंगरी साहित्य पुरस्कार -प्रतिथयश कवी विजय चोरमारे यांच्या  'स्तंभसूक्त' या कविता संग्रहाला आणि अहमदनगर येथील प्रसिद्ध कवयित्री माधुरी मरकड यांच्या  'रिंगण ' या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.

तसेच गद्यविभागात उद्योजक बळीराम पाटील चरणकर डोंगरी साहित्य पुरस्कार  सातारा येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या 'आठवणीच्या पारंब्या ' या ललितलेखसंग्रहाला आणि पंढरपूर येथील साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. वामन जाधव यांच्या  'साहित्याची अस्वादक समीक्षा' या समीक्षाग्रंथास जाहीर झाला आहे.

रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसह २०१९ चेही डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर केलेप्रमाणे पुरस्कार वितरण फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या अकराव्या डोंगरी साहित्य संमेलनात सन्मानपूर्वक वितरित केले जाणार आहेत.

दोन वर्ष कोरोना संकट काळात साहित्य संमेलन घेता आले नाही त्यामुळे दोन वर्षातील पुरस्कार वितरण झाले नव्हते. यावेळी शब्दरंग व डोंगरी साहित्य परिषदेचे  सचिव मन्सूर नायकवडी कोषाध्यक्ष सचिन पाटील, कार्यकारिणी  सदस्य प्रकाश जाधव, प्रतापराव शिंदे नथुराम कुंभार अविनाश जाधव संपत काळे श्रीरंग किनरे आदी सदस्य उपस्थित होते.

Web Title: Shabdarang-Dongri Sahitya Parishad awards announced, awards to be distributed at Sahitya Samelan to be held in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली