मराठी साहित्यातील पहिल्या दलित महिला-आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचे निधन
By श्रीनिवास नागे | Published: January 25, 2023 04:03 PM2023-01-25T16:03:30+5:302023-01-25T16:13:02+5:30
शांताबाई कांबळे यांनी आपल्या शंभर वर्षांच्या आयुष्यात त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, तीरमारे गुरुजी अशा दिग्गजांचा सहवास लाभला
सांगली: मराठी साहित्यातील पहिल्या दलित महिला - आत्मचरित्रकार शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे आज, बुधवार (दि. २५) रोजी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०० वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने जणू एक कालखंडाचा दुवाच निखळला आहे.
शांताबाई कांबळे यांनी आपल्या शंभर वर्षांच्या आयुष्यात त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, तीरमारे गुरुजी अशा दिग्गजांचा सहवास लाभला. त्यांचं आत्मचरित्र ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ फ्रेंच, इंग्रजी, हिंदी भाषेतही अनुवादित झालंय.
मुंबई दूरदर्शनवरही 'नाजुका' या मालिकेतून त्यांची आत्मकथा सादर झाली होती. त्यांचं जीवनचरित्र भावी पिढ्यांसाठीही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल, यात शंकाच नाही. भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रा.अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.