शरद पवारांनी सेनेला सल्ले देऊ नयेत : उद्धव ठाकरे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:40 AM2017-11-26T01:40:33+5:302017-11-26T01:43:53+5:30

मिरज : सत्तेत राहून मित्र पक्षावर टीका करणारे पाहिले नाहीत, असे म्हणणाºया शरद पवारांनी स्वपक्षातील वसंतदादांच्या पाठीत वार करून मुख्यमंत्रिपद मिळविले होते. स्वपक्षीयांना धोका देणाºया पवारांनी शिवसेनेला सल्ले देऊ नयेत,

 Sharad Pawar should not give advice to the army: Uddhav Thackeray's criticism | शरद पवारांनी सेनेला सल्ले देऊ नयेत : उद्धव ठाकरे यांची टीका

शरद पवारांनी सेनेला सल्ले देऊ नयेत : उद्धव ठाकरे यांची टीका

Next
ठळक मुद्देकोथळेच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री, सरकारला लाज वाटली पाहिजे शासनावर टीका केली तर पवार माझ्यावर टीका करतात.पवार आणि मोदींचे गुरू शिष्याचे नाते आहे. सत्तेत राहून मित्रपक्षावर टीका करणारे बघितले नाहीत

मिरज : सत्तेत राहून मित्र पक्षावर टीका करणारे पाहिले नाहीत, असे म्हणणाºया शरद पवारांनी स्वपक्षातील वसंतदादांच्या पाठीत वार करून मुख्यमंत्रिपद मिळविले होते. स्वपक्षीयांना धोका देणाºया पवारांनी शिवसेनेला सल्ले देऊ नयेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मिरजेत केली. सांगलीत अनिकेत कोथळे या तरुणाच्या पोलीस कोठडीतील खुनाची मुख्यमंत्री व सरकारला लाज वाटली पाहिजे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

मिरजेतील शेतकरी संवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह राज्यातील व केंद्रातील भाजप शासनावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, राज्यातील सर्वसामान्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर सरकारबद्दल का बोलायचे नाही? आम्ही सत्तेत जरूर
आहोत मात्र सत्तेशी नव्हे तर भगव्या झेंड्याशी प्रामाणिक आहोत.

मी शेतकºयांसाठी बोलल्यानंतर पवारांना शेतकरी आठवले. तुम्ही करू शकत नाही, ते मी करीत आहे. शासनावर टीका केली तर पवार माझ्यावर टीका करतात. पवार आणि मोदींचे गुरू शिष्याचे नाते आहे. सत्तेत राहून मित्रपक्षावर टीका करणारे बघितले नाहीत, असे म्हणणाºया पवारांनी काँग्रेस पक्षात असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादांच्या पाठीत वार करून मुख्यमंत्रीपद मिळविले. भाजप व शिवसेना हे पक्ष वेगळे आहेत. मात्र एकाच पक्षात असताना असा प्रकार करणाºया एकमेवाव्दितीय शरद पवारांनी शिवसेनेला सल्ले देऊ नयेत. विदेशी मुद्यावर सोनिया गांधींनी शरद पवारांना हकलून दिले होते. मात्र सत्तेसाठी काँग्रेससोबत भांडी घासणाºया पवारांनी आमच्या भानगडीत पडू नये. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत पवार शेतकºयांऐवजी क्रिकेटची चर्चा करतात.

ते म्हणाले की, सांगलीतील अनिकेत कोथळेच्या पोलिस कोठडीतील हत्येबाबत मुख्यमंत्र्यांना लाज, लज्जा, शरम वाटत नाही. भाजपच्या एका आमदाराला पोलिसांनी खंडणी मागितली. याकडे लक्ष देण्याऐवजी गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री उठसूठ गुजरातमध्ये प्रचारासाठी जात आहेत. हार्दिक पटेलने भाजपच्या नाकात दम आणला आहे, म्हणून देशातील सर्वशक्तीमान माणूस पन्नास सभा घेत आहे. मतदारांना हार्दिकची सीडी दाखविण्याऐवजी तुमच्या २३ वर्षाच्या विकासाची सीडी दाखवा. सृजनशीलतेचा आव आणून व्यक्तिगत भानगडी, लफडी काढून इतरांना वाईट ठरविण्याची भाजपची ही पध्दत आहे. गुजरात निवडणूक जिंकल्याशिवाय भाजपला पर्याय नसल्याने, भाजपने गुजरात जिंकले तर मला आश्चर्य वाटणार नाही.

राज्यात साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफी दिल्याचे सांगण्यात येते. मात्र कर्जमुक्तीचा लाभ शेतकºयांना मिळालेला नाही. कर्जमुक्ती योजनेत शिवरायांच्या नावाने आम्ही घोटाळे सहन करणार नाही, असेही ठाकरे यांनी बजावले.
राज्यातील जनतेनेही रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून मी आंदोलनाचे नेतृत्व करायला तयार आहे. शेतकºयांनी रडू नये. ते लढणे विसरले आहेत. शासनाविरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावे, माझी तयारी आहे. मात्र अन्य पक्षात ती हिंमत नाही. काँग्रेस, राष्टÑवादी, भाजप सर्वजण शिवसेनेवर टीका करतात, मात्र मी कोणाला बांधिल नाही. लोकसभा निवडणुकीत अच्छे दिनाची स्वप्ने दाखविण्यात आली, त्या पापात मीसुध्दा सहभागी आहे, असे ठाकरे यांनी कबूल केले.

सभेस मंत्री दीपक केसरकर, विजय शिवतारे, दादासाहेब भुसे, आ. राजेश क्षीरसागर, संपर्कनेते गजानन कीर्तीकर, नितीन बानुगडे-पाटील, माजी आमदार दगडू सपकाळ, जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, संजय विभूते, बजरंग पाटील, विशाल रजपूत, तानाजी सातपुते, विकास कोल्हटकर, शंभोराज काटकर, नगरसेवक शेखर माने, नगरसेविका अश्विनी कांबळे, प्रदीप कांबळे, सुवर्णा मोहिते, सुनीता मोरे, चंद्रकांत मैगुरे उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीसाठी सांगलीत येणार
विधानसभेचे निकाल पाहता सांगलीने मला काय दिले, असा विचार मी करीत नाही. यापुढे सांगली शिवसेनेला देईल, ते यापूर्वी कोणाला दिले नसेल. आठ महिन्यानंतर होणाºया सांगली महापालिका निवडणुकीसाठी मी सांगलीत येणार आहे. शिवसेना सांगलीतील सर्व समस्या सोडवेल, असेही ठाकरे यांनी सांगितले. पश्चिम महाराष्टÑात शिक्षण सम्राट व साखर सम्राटांनी साम्राज्ये उभी केली. मात्र तरुणांना रोजगारासाठी नाईलाजाने मुंबईला जावे लागते. भाजपला दिल्ली मिळाली तरी मुंबईकडे त्यांचा अजून वाकडा डोळा आहे. मुंबईमध्ये आम्ही सेवा-सुविधा देतो म्हणून मुंबईकरांनी सलग पाचव्यांदा आम्हाला निवडून दिले. असेच नाते सांगलीत जोडायचे आहे.

कोथळे कुटुंबीयांना जाहिरातीत घेणार का?
सरकारच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीत पोलीस अत्याचाराचे लाभार्थी म्हणून कोथळे कुटुंबीयांना घेणार का, अशा शब्दात ठाकरे यांनी खिल्ली उडविली. शासनाच्या योजनांचा लाभ कोणाला मिळाला याची सीआयडी चौकशी केली पाहिजे. सत्तेच्या गाद्या मिळविणारे राज्यकर्ते हेच लाभार्थी आहेत, असेही त्यांनी सांगितले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील खड्डे पडले तर आभाळ कोसळते का, असे विचारतात. मग सरकार कोसळायला पाहिजे काय, असा सवाल ठाकरे यांनी केला.

राज्यातील जनतेनेही रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून मी आंदोलनाचे नेतृत्व करायला तयार आहे. शेतकºयांनी रडू नये. ते लढणे विसरले आहेत. शासनाविरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावे, माझी तयारी आहे. मात्र अन्य पक्षात ती हिंमत नाही. काँग्रेस, राष्टÑवादी, भाजप सर्वजण शिवसेनेवर टीका करतात. मात्र, मी कोणाला बांधील नाही.
-उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

Web Title:  Sharad Pawar should not give advice to the army: Uddhav Thackeray's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.