लाइक, शेअर, फाॅरवर्ड जरा जपून, खावी लागेल जेलची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:31 AM2021-09-12T04:31:30+5:302021-09-12T04:31:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सोशल मीडियावर कोणतीही कृती करताना काळजी बाळगली नाही, तर गुन्हेगारीच्या विश्वात तुम्हाला ती घेऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सोशल मीडियावर कोणतीही कृती करताना काळजी बाळगली नाही, तर गुन्हेगारीच्या विश्वात तुम्हाला ती घेऊन जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही पोस्ट न वाचता, न पाहता लाइक्स, शेअर व फॉरवर्ड करण्यापासून सतर्क राहणे गरजेचे बनले आहे. जातीय तेढ निर्माण होईल किंवा सार्वजनिक शांतता भंग पावेल, अशा पोस्टवर आता सायबर क्राइम सेलची बारीक नजर आहे.
सांगली जिल्ह्यात सामाजिक, जातीय तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट केल्याबद्दल यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर क्राइम सेलकडून अशा प्रकरणाबाबत अधिक काळजी घेतली जात आहे. गेल्या आठ महिन्यांत सोशल मीडियावरून बदनामी केल्याबद्दल ४ गुन्हे दाखल झाले आहेत.
चौकट
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
सोशल मीडियावर न पाहता लाइक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
वापर करताना कोठेही क्लिक करताना काळजी बाळगावीच लागेल.
चौकट
अशी घ्या काळजी
अनोळखी अथवा फसवे मेसेजेस्, ई-मेल उघडू नका, तसेच कोणत्याही पोस्ट न वाचता, न पाहता लाइक, फॉरवर्ड करू नका.
जातीय, धार्मिक पोस्टला लाइक करण्यापूर्वी त्यातून सामाजिक, जातीय तेढ निर्माण होणार नाही ना याची काळजी घ्या.
पोस्टवर कमेंट करताना त्यातून कोणाची बदनामी तर हाेणार नाही, याची दक्षता घ्यावी.
चौकट
मुलींनो डीपी सांभाळा
मुलींनी डीपीबाबत अधिक काळजी घ्यावी. या फोटोचा कुणी कसाही गैरवापर करू शकतो.
आपली वैयक्तिक व गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्ती अथवा वेबसाइटवर अपलोड करू नका.
अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारू नका
चौकट
सोशल मीडियावर बदनामी, चार गुन्हे दाखल
सांगली जिल्ह्यात जानेवारी ते मे २०२१ या पाच महिन्यांच्या काळात फेसबुकद्वारे बदनामी व विनयभंगाच्या एकूण ४ केस दाखल झाल्या आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. जातीय व सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी २०२० मध्ये काही गुन्हे दाखल झाले आहेत.
कोट
जातीय तेढ, धार्मिक भावना दुखावणाऱ्या किंवा बदनामी करणाऱ्या पोस्टबाबत सायबर क्राइम लक्ष ठेवून आहे. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही पोस्ट फॉरवर्ड किंवा शेअर करताना गुन्हा घडणार नाही ना याची काळजी घ्यावी, अन्यथा अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल.
-रोहिदास पवार, पोलीस उपनिरीक्षक, सायबर क्राइम सेल, सांगली