वाळवा येथे ‘महालक्ष्मी शेतकरी’ कंपनीचे शेअर्स विक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:22 AM2020-12-25T04:22:26+5:302020-12-25T04:22:26+5:30
वाळवा : येथील महालक्ष्मी वाळवा शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स विक्री व सभासद नोंदणीस सुरुवात झाली आहे. संस्थेच्या प्रमुख मार्गदर्शिका ...
वाळवा : येथील महालक्ष्मी वाळवा शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स विक्री व सभासद नोंदणीस सुरुवात झाली आहे. संस्थेच्या प्रमुख मार्गदर्शिका स्नेहल गौरव नायकवडी व सी. एच. पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या फळ प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत या प्रकल्पासाठी मान्यता मिळाली आहे.
यावेळी संस्थेचे प्रमुख हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी, उपसरपंच पोपट अहिर, शिरगावच्या सरपंच दीपाली शिंदे, अपर्णा साळुंखे, डाॅ. राजेंद्र मुळीक , प्राजक्ता थोरात, लता पडळकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी वैभव नायकवडी म्हणाले, यामधून शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव व वेळेत पैसेही दिले जातील. महिलांना प्राधान्याने नोकऱ्या दिल्या जातील. गावागावात कंपनीचे रिटेल आऊटलेट सुरू केले जातील.