शेरीनाल्याच्या जलवाहिनीची गळती काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:37+5:302021-02-05T07:17:37+5:30
संजयनगर : ‘शेरीनाला जलवाहिनीला सांगलीत पुन्हा गळती’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिध्द झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली. जुना बुधगाव ...
संजयनगर : ‘शेरीनाला जलवाहिनीला सांगलीत पुन्हा गळती’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिध्द झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली. जुना बुधगाव रोडवरील जलवाहिनीच्या गळतीचे काम तात्काळ सुरू करण्यात आले.
सांगली शहरातून धुळगाव तालुका मिरज येथील जाणाऱ्या शेरीनाल्याच्या जलवाहिनीला गळती लागली होती. यामुळे परिसरातील गायत्रीनगर येथे घरांमध्ये व अंगणात सांडपाणी साचले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस यांनी गळती काढण्याचे आदेश दिले. मंगळवारी दिवसभर जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात आले.
चौकट
जलवाहिनी फुटल्याने या भागात पाणी साचून राहते. यासाठी चार क्रॉस पाईप टाकणे गरजेचे आहे. महापालिकेने येथील पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नगरसेवकांना पाण्याचा निचरा करण्यासाठी वारंवार सांगितले असता, ते दुर्लक्ष करत असल्याची खंत या नागरिकांनी व्यक्त केली.
फोटो ओळी : महापालिकेने जुना बुधगाव रोड येथील शेरीनाला जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण केले. (छाया : सुरेंद्र दुपटे)