शिगावला कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीचे काम काटेकाेरपणे : उत्तम गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:26 AM2021-05-10T04:26:45+5:302021-05-10T04:26:45+5:30

गावडे म्हणाले, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही अगदी प्रामाणिकपणे केली आहे. याची साक्ष समस्त शिगाव गावातील जनता ...

Shigawala Corona Disaster Management Committee's work rigorously: Uttam Gawde | शिगावला कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीचे काम काटेकाेरपणे : उत्तम गावडे

शिगावला कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीचे काम काटेकाेरपणे : उत्तम गावडे

Next

गावडे म्हणाले, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही अगदी प्रामाणिकपणे केली आहे. याची साक्ष समस्त शिगाव गावातील जनता देत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती, आशासेविका, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, पोलीस पाटील, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, ग्रामपंचायत प्रशासन सर्व कार्यरत आहेत. प्रतिबंधासोबत गावातील एकही कोरोनाबाधित रुग्ण अत्यावश्यक सेवेपासून (ऑक्सिजन, व्हेंटिलेटर) वंचित राहणार नाही, याचीसुद्धा पुरेपूर काळजी घेतली आहे. आरोग्य विभाग घर ते घर जाऊन प्रत्येक घरात कोणी आजारी आहे का, ते पाहत आहेत. नागरिकांनी आपल्याच सुरक्षेसाठी त्यांना घरी माहिती देऊन सहकार्य करावे. कोरोना प्रतिबंधक क्षेत्रात जंतुनाशक फवारणी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गाव १२ तारखेपर्यंत पूर्ण कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. जे नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर दंडात्मक कडक कारवाई करत आहोत.

कोट

गावातील कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. कुठेही फिरत नाहीत, याचा पाठपुरावा सातत्याने दक्षता समिती व ग्रामपंचायतीमार्फत होत आहे. कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरतात अशा अफवा, गैरसमज पसरवून त्या कुटुंबांना नाहक त्रास देऊ नये. त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. यामुळे अशी काळजी जबाबदार व्यक्ती घेतील, अशी अपेक्षा आहे.

- उत्तम गावडे,

अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन कमिटी

Web Title: Shigawala Corona Disaster Management Committee's work rigorously: Uttam Gawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.